आणंद : नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास झाला असला, तरी त्यांचे गुजरातच्या ‘विकासाचे मॉडेल’ गरिबी, बेरोजगारी, कुपोषण, शिक्षण आदी मूलभूत निकषांवर सपशेल अपयशी ठरल्याने, ‘विकास वेडा झाल्या’ची टीका सर्व स्तरांतून सुरू झाली, ही वस्तुस्थिती आहे. गुजरातमधील अर्थशास्त्रविषयक अभ्यासक, प्राध्यापक यांनीच ही माहिती दिली आहे.
गुजरातमधील ६२.६ टक्के मुले, ५५ टक्के महिला, ५१ टक्के गरोदर माता, तर २१.७ टक्के पुरुष कुपोषित आहेत. सन २००७ मध्ये पहिलीत प्रवेश घेतलेल्या १६ लाख ३० हजार मुला-मुलींपैकी साडेचार लाख मुले-मुली आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. राज्य सरकार बेरोजगारांची संख्या ६ लाख असल्याचा दावा करीत असली, तरी प्रत्यक्षात ५७ लाख बेरोजगार आहेत. गरिबी रेषेखालील परिवारांची संख्या ४१ लाख ३० हजार आहे. गरिबी, बेरोजगारी, शिक्षण व आरोग्य हेच आम आदमीचा विकास झाल्याचे मापदंड आहेत. मात्र, या चारही निकषांवर मोदी सरकार अपयशी ठरल्याचा दावा नागरिक स्वातंत्र्य संघटनचे सदस्य व अर्थशास्त्राचे प्राध्यापक हेमंतकुमार शाह यांनी केला.
शाह म्हणाले की, ६ ते ५९ महिन्यांची ६२.६ टक्के मुले कुपोषित असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेची २०१५-१६ ची ही आकडेवारी आहे, तसेच १२ ते २३ महिने वयोगटाच्या ५० टक्के मुलांचे लसीकरण झालेले नाही. गुजरात विकासाचे मॉडेल २००७ मध्ये सर्वप्रथम चर्चेत आले. त्या वर्षी इयत्ता पहिलीत प्रवेश केलेल्या मुलांपैकी २०१७ साली साडेचार लाख मुले इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण करीत नसतील, तर ही मोठी गळती आहे. उच्चशिक्षण घेणाºया तरुणांची देशाची सरासरी १८.८८ टक्के असताना, गुजरातमध्ये हे प्रमाण १४.७२ टक्के आहे.
सन २००१ ते २०१५ या काळात ज्या बेरोजगारांनी सरकारकडे नोंदणी केली, त्यापैकी १९ लाख बेरोजगारांना रोजगार मिळालेला नाही. नरेगात रोजगारासाठी जॉब कार्ड काढलेल्यांची संख्या ३८ लाख आहे. त्यापैकी ५ लाख ७१ हजारांनी रोजगार मागितला. त्यापैकी ४ लाख १८ हजारांना सरकार नरेगात सरासरी ३५ दिवसच काम देऊ शकले. गुजरातमध्ये २६ लाख १९ हजार गरिबी रेषेखालील कुटुंबे आहेत, असा सरकारचा दावा आहे. मात्र, फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘मुख्यमंत्री अमृतम योजने’च्या जाहिरातीमध्ये सरकारनेच ४० लाख बीपीएल कुटुंबांना साहाय्य देण्याची घोषणा केली होती. सप्टेंबर २०१४ मध्ये म्हणजे अवघ्या सात महिन्यांत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुन्हा योजनेचा शुभारंभ झाला, तेव्हा ४१ लाख ३० हजार बीपीएल कुटुंबांचा उल्लेख केला गेला. गुजरातमध्ये २०१६ पासून ‘माँ अन्नपूर्णा योजना’ या नावाने योजनेची अंमलबजावणी केली, तेव्हा ३ कोटी ५२ लाख लोकांना म्हणजे ७० लाख ४० हजार कुटुंबांना (बीपीएल-एपीएल) अन्नसुरक्षा देण्याची घोषणा केली गेली. याचा अर्थ, गुजरातमधील गरिबांची संख्या ५८ टक्के आहे, याकडे शाह यांनी लक्ष वेधले.
गुजरातमधील सुप्रसिद्ध महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे प्राध्यापक भरत मेहता म्हणाले की, यंदा निवडणुकीत विविध मागास घटकांचा ऐकू येणारा आवाज हा हिमनगाचा केवळ वरचा हिस्सा आहे. गोबेल्स नीतीचा वापर करून गुजरातच्या विकासाचा डांगोरा पिटला गेला, पण तो किती फोल आहे, ते हळूहळू स्पष्ट होत आहे. शिक्षण, आरोग्य व रोजगार या सामान्यांच्या जिव्हाळ््याच्या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरले आहे. गुजरातमधील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्याकरिता मंजूर केलेले उच्च शिक्षण कौन्सिल विधेयक मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार बहाल करते. म्हणजे कुलपती असलेल्या राज्यपालांच्या अधिकारावरही सरकारने गदा आणली आहे. या कौन्सिलने घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची मुभा नाही. शिक्षणाचे खासगीकरण, भरमसाठ फी आकारणी, यामुळे लोकांत असंतोष आहे. मात्र, तो दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.भाजपा-काँग्रेसचे ४१ जागांवर लक्षविधानसभेच्या २०१२च्या निवडणुकीत ४१ जागांवर जेमतेम १६२ ते ५,५०० मतांनी उमेदवारांचा विजय झाला आहे, अशा भाजपाच्या वाट्याच्या १९, तर काँग्रेसच्या खात्यामधील १८ जागा आहेत. या जागा हिसकावून घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी व्यूहरचना केली आहे. राजकीय चित्र निश्चित करण्यामध्ये जे विविध फॅक्टर काम करणार आहेत, त्यामध्ये या जागांचाही समावेश असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे.गुजरातेत शिक्षणाच्या खासगीकरणाचा कळसआॅल इंडिया डेमॉक्रेटिक स्टुडंट्स आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष भाविक राजा म्हणाले की, गेल्या दोन दशकांत राज्यात शिक्षणाच्या खासगीकरणाने कळस गाठला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दोन हजार रुपये फी असताना सरकारने स्थापन केलेल्या फी रेग्युलेटरी अथॉरिटीने फीची कमाल मर्यादा १५ ते २५ हजार निश्चित केली. त्यामुळे शाळांनी लगेच फी वाढविली.यापूर्वी दोनदा उच्चशिक्षणासंबंधी विधेयक आणून सर्वाधिकार आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न सरकाने केला. त्याला विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी विरोध केला. मात्र, आता उच्चशिक्षण कौन्सिल विधेयक मंजूर करून सरकारने विरोध चिरडून टाकला.एकीकडे शिक्षणावर होणारा लक्षावधी रुपयांचा खर्च व त्यानंतर पोलिसांपासून शिक्षकापर्यंत आणि अंगणवाडी सेविकेपासून कारकुनापर्यंत सर्वत्र अत्यल्प पगाराच्या कंत्राटी नोकºया अशा दुष्टचक्रात येथील युवावर्ग सापडल्याने जनतेमध्ये संताप आहे.मंदिरांत जाऊन वीज येत नसते : मोदीधंधुका : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कुटुंबाने डॉ. आंबेडकर व सरदार पटेल यांच्यावर खूप अन्याय केला असल्याचा आरोप काँग्रेसवर केला. राहुल गांधी यांच्या गुजरातमधील मंदिरांमध्ये जाण्यावर टीका करून मोदी म्हणाले की, मंदिरांमध्ये जाऊन जाऊन गुजरातमध्ये वीज येत नसते. मी इतकी वर्षे त्यासाठी काम करीत होतो, माळ घेऊन जप करीत बसलो नव्हतो. राम मंदिर प्रकरणाची सुनावणी २0१९ मध्ये लोकसभा निवडणुकांनंतर घ्यावी, अशी विनंती सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील व काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, या विषयात निवडणुकीचा मुद्दा काँग्रेसच आणत आहे. आपण ‘तिहेरी तलाक’विरुद्ध आहोत. हा मुद्दा धर्माचा नसून, महिलांच्या अधिकारांचा आहे, असेही ते म्हणाले.काँग्रेस आणि माझ्याविषयीच मोदी बोलतातअंजार (गुजरात) : गुजरातच्या भवितव्यासाठी योजनाच नसल्याने, पंतप्रधान मोदी भाषणात सारखे काँग्रेस आणि माझ्या विरोधात बोलतात, अशा तिरकस शब्दांत राहुल गांधी यांनी त्यांच्यावर शरसंधान साधले. भाषणांत मोदी काँग्रेस व काँग्रेसच्या धोरणावर टीका करीत असल्याचा हाच धागा पकडून राहुल म्हणाले की, त्यांच्या भाषणात ६० टक्के भर माझ्यावर आणि काँग्रेसचवरच असतो. गुजरातच्या भवितव्यासाठी भाजपा काय करणार आहे, याबाबत ते काहीच बोलत नाहीत. कारण विकासाच्या ‘मोदी मॉडेल’चे वास्तव उघड झाले आहे.माझ्याकडूनही चुका होतातनवी दिल्ली : ‘मी नरेंद्रभाई यांच्यासारखा नाही. मी माणूस असून, माझ्याकडून चुकाही होतात,’ असे स्पष्ट करीत राहुल गांधी यांनी महागाईसंबंधीच्या टिष्ट्वटरवरील चुकीच्या आकडेवारीवरून करण्यात आलेल्या टीकेचा समाचार घेतला. राहुल यांनी महागाईच्या मुद्द्यावरून केलेल्या टिष्ट्वटमध्ये आकडेवारीत चूक होती, नंतर ती दुरुस्तही केली.चूक लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांनी भाजपाच्या मित्रांना धन्यवादही दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ‘मी नरेंद्रभार्इंसारखा नाही. एक माणूस आहे. आपल्या हातून चुकाही होतात. त्यामुळे जीवनात गंमत येते.’