लखनौ : उत्तर प्रदेश पोटनिवडणुकांमध्ये झालेला धक्कादायक पराभव व भाजपाच्या चार दलित खासदारांनी राज्यातील नेतृत्वाबद्दल व्यक्त केलेली नाराजी याची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी घेतली आहे. उत्तर प्रदेशात सारे आलबेल का चाललेले नाही, असा जाब या दोघांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे.शनिवारी दिल्ली दौऱ्यावर आलेल्या योगी आदित्यनाथांनी अमित शहा यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशमध्ये काही आघाड्यांवर राज्य नेतृत्वाला अपयश आल्याबद्दल शाह यांनी नाराजी व्यक्त केली. शहा ११ एप्रिलला राज्याच्या दौ-यावर जात असून, तेथील स्थितीचा ते आढावा घेतील.रा. स्व. संघाच्या दोन महत्त्वाच्या पदाधिकाºयांनी नुकताच उत्तर प्रदेशचा तीन दिवसांचा दौरा केला. त्यांनी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, पक्षाचे पदाधिकारी, संघाचे राज्यातील कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्ते व लोकांशी संवाद साधला. राज्यात सारे आलबेल नाही, असे त्यांना आढळून आले. या दौºयानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी आदित्यनाथांना त्यांच्या कारभाराबद्दल जाब विचारला. (वृत्तसंस्था)>डॉ. आंबेडकर यांचा कोट भगवा; उत्तर प्रदेशात नवा वाद सुरूबदायूं : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील डुगरैया गावात जिल्हा प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भगव्या रंगाच्या कोटातील पुतळा बसविल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तेथील मूळ पुतळ्याची शनिवारी विटंबना करण्यात आली होती. स्थानिक दलितांनी त्याच्याविरोधात निदर्शने केल्यानंतर, त्या जागी नवा पुतळा बसविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले होते. केंद्र व उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार जाणूनबुजून डॉ. आंबेडकर यांचे भगवेकरण करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. गावकºयांनीही अशा पुतळ्यास विरोध केला आहे.>तोडगा काढण्याचा सल्लामुस्लीम व दलित हे भाजपाच्या विरोधात एकत्र होत आहेत. दलितांवरील अत्याचारांबद्दल सावित्रीबाई फुले, छोटेलाल खरवार, यशवंत सिंग व अशोक कुमार दोहरे या चार खासदारांनी राज्य व केंद्रीय नेतृत्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. योगी आदित्यनाथ शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींना भेटले. उत्तर प्रदेशमधील प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढा, असे त्यांना मोदींनी बजावले आहे.>महत्त्वाच्या बदलांची शक्यता?योगी आदित्यनाथांनी मोदी व शहा यांची शनिवारी सदिच्छा भेट घेतली, असे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे होते. या चर्चेनंतर भविष्यात उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या राज्य नेतृत्वात किंवा संघटनेत काही बदल झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे भाजपामधील सूत्रांनी सांगितले. राज्यात बसपा व समाजवादी पार्टी एकत्र आल्याने, जो राजकीय परिणाम साधला जात आहे, त्याबद्दल रा. स्व. संघाने भाजपा नेतृत्वाला सावध केले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आलबेल का नाही?, मोदी, शहा यांनी विचारला आदित्यनाथांना जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 6:33 AM