पतीने नसबंदी केल्यानंतरही पत्नी झाली प्रेग्नेंट; नवऱ्यासह कुटुंब हैराण, पण सत्य समोर आलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 09:31 AM2021-05-17T09:31:05+5:302021-05-17T09:37:32+5:30
सदर घडलेला प्रकारामुळे संबंधित महिलेचा पतीच्या कुटुंबियांनी छळ सुरु केला.
राजस्थानमधील अजमेर शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अजमेरमध्ये राहणाऱ्या एका युवकाने परिवार सेवा अंतर्गत नसबंदी केली होती. मात्र त्यानंतर 4 महिन्याने त्याची पत्नी गर्भवती झाल्याचा प्रकार समोर आला. पत्नी गर्भवती झाल्यानंतर युवकाने पुन्हा त्याची तपासणी केली, पण डॉक्टरांनी त्याला नसबंदी यशस्वी झाली असल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या सांगण्याने कुटुंबात आणखी तणाव वाढला.
सदर घडलेला प्रकारामुळे संबंधित महिलेचा पतीच्या कुटुंबियांनी छळ सुरु केला. शेवटी त्या महिलेने जिल्हा अधिकारी आरती डोगरा यांना घडलेली घटना सांगितली. यानंतर आरती डोगरा यांनी सर्व गोष्टी आणि कुटुंबातील तणाव समजून तो दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच या सर्व प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली.
पत्नी नेहमी दु:खी अन् थकलेली असायची; पतीला आला संशय, बेडरूममध्ये कॅमेरा लावला अन्... https://t.co/zo2MDV0yJQ
— Lokmat (@MiLOKMAT) May 15, 2021
संबंधित महिलेने डीएनए (DNA) तपासणी करण्यास देखील तयार असल्याचे सांगितले. तपासणीला वेग आला आणि या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं. अधिकारी आरती डोंगरा यांनी मुख्य चिकित्सलाय आणि स्वास्थ अधिकारी डॉक्टर के. के. सोनी यांना फोन लावून याबाबत चौकशी केली तेव्हा सत्य घटना समोर आली. चौकशीत संबंधित व्यक्तीची नसबंदी डॉक्टर भगवान सिंग गहालोत यांनी केली होती. परंतु ती अयशस्वी झाली होती. डॉक्टर सोनी यांनी खुलासा केला की, शंभर केसेस पैकी एखादी केस अयशस्वी देखील होऊ शकते.
१७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा महिलेच्या पडला प्रेमात; संधी मिळताच बागेत प्रपोजही केली, अन्... https://t.co/KDuxtp4uin
— Lokmat (@MiLOKMAT) May 14, 2021