शेतकऱ्यांना मोदी सरकार आज देणार खूषखबर?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 06:21 AM2019-01-28T06:21:27+5:302019-01-28T06:21:57+5:30
अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी योजना जाहीर करण्याचे संकेत कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी दिले होते.
नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार सोमवारी खूषखबर देण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी होत असून त्यात हे निर्णय अपेक्षित आहेत.
अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी योजना जाहीर करण्याचे संकेत कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी दिले होते. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे अनेक पर्याय कृषी मंत्रालयाने दिले आहेत. यापैकी कोणता पर्याय मंत्रिमंडळ मंजूर करते, यावर त्याचे स्वरूप ठरेल. तीन राज्यांमधील सत्ता गमावल्यानंतर मोदी सरकार काही भरीव करण्याची घाई करत आहे. मात्र, आता अशी योजना राबवून त्याचा लोकसभा निवडणुकीत कितपत फायदा होऊ शकेल, याविषयी मात्र राजकीय निरीक्षक साशंक आहेत.