पॉर्न फिल्मच्या आहारी गेलेल्या पतीला कंटाळलेली पत्नी पोहोचली सुप्रीम कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 10:00 AM2018-02-14T10:00:16+5:302018-02-14T10:04:43+5:30
महिलेचा पती इंटरनेटच्या माध्यमातून पॉर्न बघण्याच्या आाहारी गेला आहे.
नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टात मुंबईच्या एका विवाहित महिलेने याचिका दाखल केली आहे. महिलेचा पती इंटरनेटच्या माध्यमातून पॉर्न बघण्याच्या आाहारी गेला आहे. पतीच्या या सवयीमुळे त्यांचं वैवाहिक आयुष्य दिवसेंदिवस बिघडत असल्याचं महिलेने याचिकेत म्हंटलं आहे. पॉर्न साइट्सवर बंदी आणावी, अशी या महिलेची मागणी आहे. मुंबईत राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेने सुप्रीम कोर्टाकडे ही मागणी केली आहे.
10 मार्च 2016 रोजी महिलेचं लग्न झालं होतं. पण लग्नानंतर त्या महिलेचं पतीशी नात तणावपूर्ण झालं. पती अती प्रमाणात पॉर्न बघत असल्याने त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. वैवाहिक आयुष्यात मतभेत झाल्याने कौटुंबिक वादही सुरू झाले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने पॉर्न साइट्स ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला होता.
केंद्र सरकारकडून बाजू मांडलेल्या अॅडिशनल सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद या प्रकरणातील निर्देश घेऊन संबंधित अथॉरिटीला या प्रकरणी सल्ला देतील, असं सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी आणि मार्च 2016म ध्ये आदेश दिले होते. दरम्यान, हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे.