लखनऊ : भाजपने उत्तर प्रदेशात मिळविलेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या मंत्रिमंडळात बदल करावे लागणार आहेत. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तारही केला जाणार आहे. यात तरुण नेत्यांना सामावून घेतले जाईल, असे समजते.त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन सहकारी लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्या तीन जागा रिक्त होणार आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे (एसबीएसपी) नेते आणि मंत्री ओ.पी. राजभर यांनी भाजपविरुद्ध बंड केल्याने योगी यांनी त्यांना निलंबित केले होते. त्यामुळे तेही पद रिकामे आहे.समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांची आघाडी असूनही लोकसभेसाठी पक्षाच्या ६२ जागा निवडून आल्याने भाजप राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना त्यांच्या परिश्रमाचे फळ देऊ पाहत आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात प्रथमच बदल होणार आहेत. आदित्यनाथ यांनी एका मुलाखतीत सांगितले की,राज्य मंत्रिमंडळात लवकरचफेरबदल केले जातील. राज्याच्या हितासाठी सर्व ते आम्हीकरू. (वृत्तसंस्था)
योगी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, तरुण नेत्यांना स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 4:41 AM