लय भारी! वयाच्या 21 व्या वर्षी 'तिने' रचला इतिहास; झाली सर्वात तरुण आदिवासी उपमहापौर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 03:45 PM2022-04-14T15:45:31+5:302022-04-14T15:46:53+5:30

Damyanti Majhi : दमयंती स्वत: झोपडपट्टीतील मुलांची शिकवणी घेऊन आपल्या कुटुंबाला मदत करते आणि अभ्यासाचा खर्चही उचलते. 

youngest deputy mayor of cuttack municipal corporation 21 years old damyanti majhi | लय भारी! वयाच्या 21 व्या वर्षी 'तिने' रचला इतिहास; झाली सर्वात तरुण आदिवासी उपमहापौर 

लय भारी! वयाच्या 21 व्या वर्षी 'तिने' रचला इतिहास; झाली सर्वात तरुण आदिवासी उपमहापौर 

Next

नवी दिल्ली - ओडिशातील कटक येथील झोपडपट्टीत राहणारी 21 वर्षीय दमयंती माझी सर्वात तरुण उपमहापौर म्हणून निवडून आली आहे. दमयंतीची कटक महानगरपालिकेच्या पहिल्या आदिवासी उपमहापौरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत दमयंतीची बिनविरोध निवड झाली आहे. तिने बीजेडीच्या तिकिटावर प्रभाग 49 मधून निवडणूक लढवली आणि शहरातील सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आली आहे. 

कटकच्या बालीसाही झोपडपट्टीत जन्मलेली दमयंती तीन भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे. यासह, पदवीधर होणारी ती तिच्या कुटुंबातील पहिली सदस्य आहे. ती रेनशॉ विद्यापीठातून एम.कॉम करत आहे. 2017 मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले. तिची आई रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. दमयंती स्वत: झोपडपट्टीतील मुलांची शिकवणी घेऊन आपल्या कुटुंबाला मदत करते आणि अभ्यासाचा खर्चही उचलते. 

पदभार स्वीकारल्यानंतर उपमहापौर म्हणून त्यांचे पहिले लक्ष्य शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवणे हे असेल. दमयंतीने बीजेडी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना विशेष पदासाठी विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच दमयंतीने शहरातील काही जुन्या समस्यांची जाणीव आहे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे असं म्हटलं आहे. 

दमयंतीने पाणी साचण्याच्या समस्या, ट्रॅफिक जाम, पाणीपुरवठा आणि पथदिवे या शहराच्या काही प्रमुख नागरी समस्या आहेत. सर्वांच्या सहकार्याने आणि दिशानिर्देशाने या समस्यांचे निराकरण करण्यावर माझा मुख्य भर असेल असं म्हटलं आहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर दमयंती लवकरच राजकारणात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: youngest deputy mayor of cuttack municipal corporation 21 years old damyanti majhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.