पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; २० निरीक्षकांसह १७ सहायक निरीक्षकांच्या बदल्या
By सूर्यकांत वाघमारे | Published: January 31, 2024 11:33 AM2024-01-31T11:33:32+5:302024-01-31T11:33:41+5:30
अनेकांना धक्का
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईपोलिस आयुक्ताक्यातील निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या मोठ्या संख्येने बदल्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री हे बदली आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये 20 पोलिस निरीक्षक, 17 सहायक निरीक्षक व 20 उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या अनुशंघाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता मागील काही दिवसांपासून वर्तवली जात होती. त्यासाठी आयुक्तालयात अधिकाऱ्यांच्या बैठकांचे देखील सत्र सुरु होते. तर काहींनी बदली थांबवण्यासाठी देखील प्रयत्न चालवल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर मंगळवारी रात्री चर्चांना पूर्णविराम लावत पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी बदली आदेश काढले. त्यामध्ये पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ, शशिकांत चांदेकर, प्रमोद तोरडमल, राजेंद्र कोते, भागुजी औटी, दिलीप गुजर, रमेश जाधव, अशोक गायकवाड, संजय चव्हाण, मधुकर भटे, राजेंद्र कदम, सतीश कदम, औदुंबर पाटील, विजय पन्हाळे, प्रमोद भोसले, अजय भोसले, पराग सोनावणे, अतुल आहेर, हनिफ मुलानी, वैशाली गलांडे यांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत. त्याशिवाय 17 सहायक पोलिस निरीक्षक व 20 पोलिस उपनिरीक्षक यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.
मागील काही वर्षात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने एकाच वेळी मोठ्या संख्येने बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या अनुशंघाने केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये काहींना धक्का दिल्याची देखील चर्चा सुरु आहे. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार घेतल्यानंतर शहरात अवैध धंद्यांना थारा न देण्याची ताकीद अधिकाऱ्यांना केली होती. मात्र काही निरीक्षक वरिष्ठांच्या चौकडीच्या धोरणाला धरून स्थानिक पातळीवर अवैध धंद्यांना सूट देत होते. यामुळे आयुक्तांच्या धोरणालाही खीळ बसत होती.