शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
3
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
4
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
5
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
6
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
7
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
8
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
9
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
10
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
11
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
12
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
13
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
14
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
16
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
17
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
18
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
19
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
20
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास

मालमत्ता कर कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा ढोंगीपणा सुरू असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 1:34 AM

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना निलंबित करून आपलं तेच खरं करून दाखविण्याचा केविलवाणा प्रकार केल्याचे मत महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी शहरातील शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

पनवेल : महाविकास आघाडीचे नगरसेवक जनतेची भूमिका योग्यरीत्या मांडत असताना पनवेल पालिकेच्या महापौरांनी महासभेत अयोग्य निर्णय घेत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना निलंबित करून आपलं तेच खरं करून दाखविण्याचा केविलवाणा प्रकार केल्याचे मत महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी शहरातील शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.यावेळी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना सल्लागार बबन पाटील, शेकाप ज्येष्ठ नेते नारायण घरत, काँग्रेस नेते सुदाम पाटील, शेकाप पमपा जिल्हा चिटणीस गणेश कडू, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी  यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी, लोकशाहीच्या नियमांना पायदळी तुडवत प्रशासनाबरोबर नगरसेवकांचे निलंबन केल्याने आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या निष्क्रिय महापौरांचा जाहीर निषेध करतो. मालमत्ता कराबाबत पनवेल पालिकेच्या वतीने झालेल्या महासभेत पनवेल पालिका स्थापनेपासून पुढील पाच वर्षे कोणताही नवीन मालमत्ता कर लागू करू नये, अशी महाविकास आघाडीच्या वतीने प्रमुख मागणी करण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्षनेते यांच्यामध्ये गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे महापौरांमार्फत महाविकास आघाडीच्या १५ नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले. आपले खरे करण्याच्या नादात भाजप उघडे पडल्यामुळे अखेर महाविकास आघाडीचे नगरसेवक कर्नाळा बँकेच्या कुबड्या घेऊन हाणून पडण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसत आहेत  मात्र प्रत्यक्षात जनतेला  भाजपच्या मनात काय आहे हे कळल्यामुळे आता या सत्ताधाऱ्यांची पळता भुई थोडी झाली. सिडकोच्या तुलनेत भाजप स्वार्थी स्वभावामुळे नागरिकांच्या खिशावर डल्ला मारून जास्तीचा कर लागू करतात आणि त्याला महाविकास आघाडीचा कायम विरोध राहणार असून, सत्ताधाऱ्यांना लवकरच फेरविचार करायला लावणार असल्याचा इशारा यावेळी दिला. महाविकास आघाडीचे नगरसेवक जनतेची भूमिका योग्यरीत्या मांडत असताना महापौरांनी अयोग्य निर्णय घेत नगरसेवकांना निलंबित केले असल्याचा आरोप आमदार बाळाराम पाटील यांनी केला. तसेच, कुठलीही सुखसुविधा न देता पालिका मालमत्ता कर लावायला बघते हे अत्यंत चुकीचे असून, याबाबत शासनदरबारी नक्कीच न्याय मागणार असल्याचे आमदार बबन पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीबाबत असलेला राग व्यक्त करण्यासाठी सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचे नगरसेवक गणेश कडू यांनी सांगितले. पीएमसी बँकेतील दहा कोटींचे काय झाले?कर्नाळा बँकेचा विषय दडपण्यासाठी आम्ही मालमत्ता कराचा विषय लावून धरला असल्याचे आरोप सभागृह नेते परेश ठाकूर यांनी करून आपल्या घोडचुकांवर पांघरूण घालण्याचा प्रकार केला आहे. पीएमसी बँकेत पालिकेचे दहा कोटी बुडाले आहेत. त्यावर सत्ताधारी गप्प का, असा प्रश्न आमदार बाळाराम पाटील यांनी उपस्थित केला.