बोगस संघटनेच्या दोघांना अटक; कारवाईच्या धाकावर उकळली जायची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:20 AM2018-02-13T03:20:04+5:302018-02-13T03:20:11+5:30

केंद्र सरकारची संघटना असल्याचे भासवुन खंडणी उकळणारया दोघांना गुन्हे शाखा पोलीसांनी अटक केली आहे. एकांद्या बनावट अर्जाद्वारे व्यवसायीकांना कारवाईची धमकी देवून त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे.

Bogas association arrested; Rumination of boil over action | बोगस संघटनेच्या दोघांना अटक; कारवाईच्या धाकावर उकळली जायची खंडणी

बोगस संघटनेच्या दोघांना अटक; कारवाईच्या धाकावर उकळली जायची खंडणी

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : केंद्र सरकारची संघटना असल्याचे भासवुन खंडणी उकळणारया दोघांना गुन्हे शाखा पोलीसांनी अटक केली आहे. एकांद्या बनावट अर्जाद्वारे व्यवसायीकांना कारवाईची धमकी देवून त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे. याची माहिती मिळताच पोलीसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे. तर संघटनेचा उल्लेख असलेली त्यांची कार देखिल पोलीसांनी जप्त केली आहे.
केंद्र अथवा राज्य सरकारची संघटना असल्याचे भासवणारया बोगस संघटना शहरात वाढल्या आहेत. त्यामध्ये मानवाधिकार, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, ह्युमर राईट्स अशा संघटनांचा समावेश आहे. सामाजिक संघटना म्हणुन धर्मादाय आयुक्त कार्यालयात अशा संघटनांची नोंद होत आहे. यानंतर ती संघटना थेट केंद्र अथवा राज्याशी संबंधीत असून पदाधीकारी व सदस्य निवडले जातात. याकरिता संघटनेच्या पदाचे फायदे सांगून इच्छुकांकडून लाखो रुपये घेतले जातात. शिवाय मदतीच्या बहाण्याने घडत असलेल्या गैर प्रकारांच्या तक्रारी मागवल्या जातात. अशी एखांदी तक्रार प्राप्त झाल्यास ज्याच्याविरोधात तक्रार आहे, त्यांना कारवाईचा धाक दाखवुन पैसे उकळले जातात. शहरात मोठ्या प्रमाणात अशा बोगस संघटनांचा सुळसुळाट सुटला असल्याचे वृत्त २४ जानेवारीला लोकमतने प्रसिध्द केले होते. अशा बोगस संघटनांमुळे शासनाची बदनामी व सर्वसामान्यांची फसवणुक होत असल्याने संबंधीतांवर कारवाईची गरज व्यक्त केली होती. याची दखल घेत गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी देखिल बोगस संघटनांवर कारवाईच्या सुचना पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीसांकडून अशा बोगस संघटनांच्या पदाधिकारयांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. यादरम्यान पनवेलमधील क्राईम इंटेलीजन्स फोर्स नावाच्या संघटनेबद्दल गुन्हे शाखेचे उपआयुक्त तुषार दोशी यांना मिळाली होती. त्यानुसार युनिट दोन मार्फत सुरु असलेल्या तपासादरम्यान दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांची एक कार (एमएच ४६ एपी ९४७२) देखिल जप्त करण्यात आली आहे. या कारवर संघटनेचा ठळक अक्षरात उल्लेख करण्यात आलेला आहे. तपासादरम्यान त्यांनी अनेकांना धमकावुन लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. तर काही नागरीकांनी या संघटनेला भुलून त्यांच्याकडे केलेल्या तक्रारींचे अर्ज देखिल पोलीसांच्या हाती लागले आहेत. यामुळे या संघटनेसह अशा इतर बोगस संघटनांचे पदाधीकारी पोलीसांच्या रडारवर आले आहेत. अटक केलेल्या दोघांचे लागेबंधू दिल्लीतील काही व्यक्तींपर्यंत देखिल असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शहरात उघडपने अद्यापही अशा अनेक बोगस संघटनांच्या पदाचा उल्लेख असलेल्या अलिशान कार दिसत असतानाही, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Bogas association arrested; Rumination of boil over action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा