महाड : नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत असली तरी काँग्रेसच्या स्नेहल जगताप आणि शिवसेना-भाजपा युतीच्या भाग्यश्री म्हामुणकर यांच्यातच खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. मनसे-राष्ट्रवादी-काँग्रेस युतीच्या प्रतीक्षा कुलकर्णी देखील नगराध्यक्षपदाच्या लढतीत रिंगणात आहेत. तर १७ नगरसेवक पदासाठी एकूण ४० उमेदवार रिंगणात असून प्रभाग चारमध्ये शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष संदीप ठोंबरे, प्रभाग ५ मध्ये रोहित गोविलकर व प्रभाग ६ मध्ये अमीन मुरुडकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आपले नशीब आजमावत आहेत.प्रभाग १ अ गोविंद राक्षे व अपक्ष अमानुल्ला पुरकर, १ ब मध्ये काँग्रेसच्या विद्या साळी व भाजपाच्या सारिका तळवेटकर यांच्यात दुरंगी लढत होत आहे. प्रभाग २ मध्ये देखील काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये दुरंगी सामना होणार आहे. २ अ मध्ये प्रमोद महाडिक (काँग्र्रेस) व सुरेश मोरे (शिवसेना), प्रभाग २ ब मध्ये रश्मी बाईत (काँग्र्रेस) व सुरेश मोरे (शिवसेना) यांच्यात लढत होत आहे. प्रभाग ३ मध्ये देखील दुरंगी लढती होत असून काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर व शिवसेनेचे सुबोध गांगण यांच्या व ३ ब मध्ये काँग्रेसच्या सपना बुटाला व भाजपाच्या नेहा कोकणे-पवार यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग ४ अ मध्ये मनोहर चव्हाण (काँग्र्रेस), शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक सावंत व संदीप ठोंबरे (अपक्ष) रिंगणात असून ५ ब मध्ये शुभांगी बोरसे-शेडगे (शिवसेना) व काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सुरेखा चव्हाण यांच्यात सरळ लढत होत आहे. प्रभाग ५ मध्ये ५ अ संजना निगडेकर (राष्ट्रवादी), सुषमा यादव काँग्र्रेसच्या विद्यमान नगरसेविका व भाजपाच्या सुप्रिया चिखलकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. प्रभाग ५ ब मध्ये काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, रोहित गोविलकर (अपक्ष), सिद्धेश पाटेकर (शिवसेना) व राकेश शहा (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग ६ अ मध्ये नासिमा गोडमे राष्ट्रवादी, फातीमा पठाण शिवसेना, हमीदा शेखनाग काँग्रेस यांच्यात तर ६ ब मध्ये काँग्रेसचे वजीर कोंडिवकर, राष्ट्रवादीचे अल्ताफ काझी, मुखतार तरे शिवसेना व अमिन मुरुडकर अपक्ष यांच्यात सामना होत असून प्रभाग ७ अ मध्ये सायली मेहता (शिवसेना), मनीषा जंगम (काँग्रेस) प्रणिता उमासरे मनसे यांची तिरंगी लढत होणार आहे. तर ७ ब मध्ये चेतन पोटफोडे शिवसेना, विजय मिरगल काँग्रेस व दिग्विजय गुफे हे तिन्ही रिंगणात आहेत. प्रभाग ८ अ मध्ये जयश्री शिरशिवकर (शिवसेना), भाग्यश्री फटाणकर (काँग्रेस) यांच्यात तर ८ ब मध्ये विद्यमान नगरसेवक सुदेश कलमकर (काँग्रेस) व सुनील अगरवाल (शिवसेना) यांच्यात दुरंगी सामना होणार आहे. प्रत्येक प्रभागात सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या प्राथमिक प्रचारफेऱ्या संपल्या आहेत.
काँग्रेस-शिवसेनेत सरळ लढत
By admin | Published: November 15, 2016 4:46 AM