शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...
2
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!
4
प्रार्थनास्थळ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; अनेक याचिका दाखल, केंद्राचे उत्तर येणे बाकी
5
केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी
6
आता गव्हाचे दर कमी होणार, सरकारने स्टॉक लिमिटमध्ये केली घट!
7
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात
8
"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप
9
'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी
10
₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू
12
ब्लॅक, बोल्ड & ब्युटिफूल.. 'बबिता जी'! मुनमुन दत्ताच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर हवा...
13
INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!
14
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
15
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
16
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
17
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
18
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
19
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

CoronaVirus News: पनवेल परिसरातील पर्यटनस्थळे राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:35 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पांडवकडा, कर्नाळा अभयारण्याचा समावेश

- वैभव गायकर/मयूर तांबडे पनवेल : राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथील केल्याने मागील तीन महिन्यापासून ठप्प पडलेले व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. असे असले तरी कोरोनाचा धोका कायम आहे. पनवेल परिसरात दरदिवशी कोरोनाच्या रूग्णांत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल प्रशासनाने शहरातील गर्दीचे ठिकाणे बंद केली आहे. यापार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरातील पर्यटनस्थळे सुध्दा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.पनवेलला परिसरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे रायगडसह ठाणे आणि मुंबई उपनगरातील पर्यटक मोठ्याप्रमाणात येथे पर्यटनासाठी येतात. सध्या कोरोनाचे संकट आहे. पर्यटकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील कनार्ळा अभयारण्य ,पांडवकडा धबधबा ,माची प्रबळ(कलावंतीण दुर्ग ) आदींसह लहान मोठे पर्यटनस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.पनवेल मधील कनार्ळा अभयारण्य हे निसर्गप्रेमींसाठी नेहमीच पर्वणीचे ठरले आहे. येथील निसर्ग सौंदर्य ,पशु पक्षी ,जीवसृष्ठी हे पर्यटकांना आकर्षित करीत असते.वर्षभरात लाखो पर्यटक याठिकाणी येतात. विशेषत: पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी रिघ लागलेली असते. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा असतो. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून कनार्ळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात सुध्दा हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवले जाणार असल्याची माहिती कनार्ळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांनी दिली. त्याचप्रमाणे खारघर मधील पांडवकडा धबधबा देखील पावसाळ्यात पर्यटकांना भूरळ घालतो. पावसाळ्यात या ठिकाणी तरूणाईचे जथ्थे येतात. येथील धबधब्यात बुडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. यावर्षी देखील पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही, असे वनविभागाचे अधिकारी डि.एस. सोनावणे यांनी दिली.धरणक्षेत्रात पोलीस बंदोबस्तात होणार वाढनवीन पनवेल : पावसाळ्यात धरण क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना मज्जाव घालण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानुसार तालुक्यातील गाढेश्वर, मोरबे धरण आणि माचीप्रबलच्या मार्गावर पोलीस बंदोबस्तात वाढ केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.पावसाला सुरूवात झाल्याने पनवेल तालुक्यातील धरण पर्यटकांना खुणावत आहेत. दरवर्षी मोठ्याप्रमाणात पर्यटक या ठिकाणी येतात. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होतात. परिणामी पोलीस यंत्रणेची तारांबळ उडते. पोलीस सर्वांना सावधानतेचा इशारा देतात मात्र याकडे पर्यटक कानाडोळा करतात. परंतु यावर्षी कोरोना संसर्गामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. धरणाकडे जाणाºया प्रत्येक मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला जाणार आहे.सध्या देशभरात कोरोनाचे सावट आहे. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पोलीस काळजी घेत आहेत. पावसाळ्यात पर्यटकांना मज्जाव करण्यासाठी गाढेश्वर , शांतीवन, नेरे, हरिग्राम, माची प्रबळ, कनार्ळा परिसर, कुंडी धबधबा परिसरामध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या