शहरात डेब्रिजमाफिया पुन्हा सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:24 AM2019-04-12T00:24:04+5:302019-04-12T00:24:59+5:30

निवडणुकीची रणधुमाळी पथ्यावर : एमआयडीसीमध्ये भराव सुरू; नवी मुंबई महापालिकेसह शासनाकडेही तक्रार

Debris mafia again active in the city | शहरात डेब्रिजमाफिया पुन्हा सुसाट

शहरात डेब्रिजमाफिया पुन्हा सुसाट

Next

- नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून महापालिका कार्यक्षेत्रामध्ये डेब्रिजमाफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. अडवली-भुतावलीसह विविध ठिकाणी मोकळ्या भूखंडावर बांधकामाचा कचरा टाकला जात आहे. या अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनही दुर्लक्ष करत असल्यामुळे दक्ष नागरिकांनी महापालिका, तहसील कार्यालयासह मंत्रालयामध्येही तक्रारी केल्या आहेत.


स्वच्छता अभियानामध्ये देशात सातव्या व राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला डेब्रिजचे अतिक्रमण रोखण्यात अपयश येऊ लागले आहे. ठाणे, मुंबई व नवी मुंबईमध्येही इमारत दुरुस्ती व जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन बांधकामे केली जात आहेत. यामुळे रोज हजारो टन बांधकामाचा कचरा तयार होत आहे. हा सर्व कचरा नवी मुुंबईच्या हद्दीमध्ये टाकण्यासाठीचे रॅकेट सक्रिय झाले आहे. महापालिकेने डेब्रिजविरोधी भरारी पथक सक्रिय केल्यानंतर काही दिवस अतिक्रमण थांबले होते; परंतु लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होताच डेब्रिज माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. अडवली - भुतावली परिसरामधील शेतजमिनीवर यापूर्वी हजारो टन डेब्रिज टाकले आहे. त्याच परिसरामध्ये ५ एप्रिलपासून पुन्हा भराव सुरू झाला आहे. रोज शेकडो वाहनांमधून बांधकामाचा कचरा याठिकाणी टाकला जात आहे. बिनधास्तपणे सुरू असलेले अतिक्रमण थांबविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याशिवाय इतर मोकळे भूखंड व रोडच्या बाजूलाही कचरा टाकला जात आहे.


महापालिका, एमआयडीसी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे डेब्रिजचा भराव करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात नाही. एमआयडीसीमध्ये नाल्यामध्येही भराव टाकल्याचे निदर्शनास येत आहे. नाल्यामधील भरावामुळे पावसाचे पाणी खाडीत जाण्यास अडथळे निर्माण होणार आहे. परिणामी हे पाणी लोकवस्तीमध्ये जाऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अडवली - भुतावली परिसरामधील शेतकºयांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व महसूल विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र लेखी पत्र देऊनही काहीही कारवाई केली जात नाही. यामुळे शेतकºयांनी गुरुवारी मंत्रालयामध्ये जाऊन महसूल विभागाकडेही तक्रार केली आहे. शेतजमिनीवरही भराव सुरू केला आहे. याविषयी वारंवार तक्रारी केल्या आहेत. २०१४ पासून लेखी पाठपुरावा केला आहे. विधानसभेमध्येही या विषयावर लक्ष वेधण्यात आले होते. त्याच ठिकाणी पुन्हा भराव सुरू असून अतिक्रमण थांबविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.



किती दिवस लढा द्यायचा?
डेब्रिजच्या अतिक्रमणाविषयी बोनकोडे गावामधील नागरिक अमोल विजय नाईक यांनी गुरुवारी मंत्रालयामध्ये लेखी तक्रार केली आहे. अडवली - भुतावली परिसरामध्ये सुरू असलेल्या डेब्रिजच्या भरावाविरोधात २०१४ पासून लढा देत आहे. यापूर्वी डेब्रिजचे अतिक्रमण करणाºयांनी कुटुंबीयांवर डम्पर चालविण्याचा प्रयत्न केला होता. अनेक प्रकारे दबाव आणला जात आहे. निवडणुका सुरू झाल्यापासून पुन्हा अतिक्रमण सुरू झाले असून अजून किती दिवस आम्ही लढा द्यायचा असा प्रश्न उपस्थित केला असून माफियांमुळे कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचेही नमूद केले आहे.

प्रशासनाचेही अभय
अडवली - भुतावलीसह शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव केला जात आहे. याविषयीची लेखी तक्रार देऊन छायाचित्रेही दाखवून हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे; परंतु यानंतरही संबंधित अतिक्रमण थांबविले जात नाही. यामुळे प्रशासनामधील काही कर्मचाºयांचेच त्याला अभय असल्याचा संशय दक्ष नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पर्यावरणाचा ºहास
डेब्रिजच्या अतिक्रमणामुळे पर्यावरणाचा ºहास होऊ लागला आहे. एमआयडीसीमधील मोकळे भूखंड व नाल्यांमध्येही भराव सुरू आहे. महामार्गाच्या बाजूला व खारफुटीमध्येही भराव टाकला जात आहे. डेब्रिजचे अतिक्रमण थांबविले नाही तर भविष्यात पर्यावणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Debris mafia again active in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.