शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

बदनामीस लेखापरीक्षकही जबाबदार

By admin | Published: November 14, 2016 4:38 AM

महापालिकेच्या अनेक विभागांत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमे व सोशल मीडियामधून प्रसारित होऊ लागली आहेत.

नामदेव मोरे / नवी मुंबई

महापालिकेच्या अनेक विभागांत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमे व सोशल मीडियामधून प्रसारित होऊ लागली आहेत. यामुळे आतापर्यंत पुरस्कारामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या नवी मुंबईची देशभर बदनामी होऊ लागली आहे. या बदनामीस पालिकेचे मुख्य लेखापरीक्षकही जबाबदार असल्याची टीका होऊ लागली आहे. लेखापरीक्षकांनी नियमाप्रमाणे साप्ताहिक अहवाल स्थायी समितीसमोर ठेवले नाहीत व कामकाजातील अनियमितता निदर्शनास आणून दिल्या नसल्याने त्यांच्यावरच कारवाईची मागणी केली जाऊ लागली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर, स्काडा, शिक्षण मंडळ, अभियांत्रिकी व इतर विभागांमध्ये घोटाळे झाल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. वास्तविक याविषयी वास्तव व वस्तुनिष्ठपणे माहिती पालिका आयुक्त तुकाराम मुंढे किंवा प्रशासनाच्या वतीने अद्याप देण्यात आलेली नाही. महापालिका रोज उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर केलेल्या कारवाईची प्रेसनोट प्रसिद्धीमाध्यमांकडे पाठवत असते. गावठाणांमधील घरांवरील कारवाईनंतर प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष निर्माण होताच अफवांवर विश्वास ठेवू नका, असा खुलासा प्रशासनाने स्वत:हून केला; पण महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना ते आरोप खरे आहेत की खोटे, याविषयी एकही खुलासा अद्याप तयार करण्यात आलेला नाही. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे. मागील स्थायी समिती बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते जयवंत सुतार यांनी प्रशासनच महापालिकेची बदनामी करत असल्याचा आरोप केला होता. वास्तविक महापालिकेच्या बदनामीला आता मुख्य लेखापरीक्षकांनाही जबाबदार धरले जाऊ लागले आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून लेखापरीक्षकपदावर शासननियुक्त अधिकारी कार्यरत असतो. सद्यस्थितीमध्ये डॉ. सुहास शिंदे हे आॅक्टोबर २०१३ पासून या पदावर कार्यरत आहेत.नियमाप्रमाणे शिंदे यांनी प्रत्येक आठवड्याला महापालिकेला येणे असलेल्या रकमांच्या वसुलीच्या बाबतीत किंवा तिच्या लेख्यांच्या बाबतीत जे कोणतेही महत्त्वाचे अयोग्य किंवा नियमबाह्य प्रकार आढळून येतील त्यासंबंधी स्थायी समितीमध्ये अहवाल सादर करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या लेखापरीक्षकाने महानगरपालिकेच्या लेख्यांची साप्ताहिक तपासणी व लेखापरीक्षण केले पाहिजे. त्यावरील आपला अहवाल स्थायी समितीकडे पाठवला पाहिजे व स्थायी समितीदेखील वेळोवेळी व तिला योग्य वाटेल अशा कालावधीपर्यंत स्वतंत्रपणे महानगरपालिकेच्या लेख्यांची तपासणी व लेखापरीक्षण करू शकेल, असा कायद्यात स्पष्ट उल्लेख आहे. विद्यमान लेखापरीक्षक तीन वर्षे त्या पदावर आहेत; पण त्यांनी कधीही अशाप्रकारे लेखापरीक्षण अहवाल स्थायी समितीकडे दिलेले नाहीत. प्रत्येक आठवड्याला त्यांनी अहवाल सादर केले असते तर विद्यमान स्थितीत सुरू असलेली बदनामी झाली नसती. याशिवाय लेखापरीक्षक असतानाच ते काही महिने मुख्य लेखा व वित्त अधिकारी व आता प्रशासन उपआयुक्त म्हणून काम करत असून मूळ कामांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.