ई-कचऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Published: May 1, 2016 02:43 AM2016-05-01T02:43:37+5:302016-05-01T02:43:37+5:30

शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणा ई कचऱ्याच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ई - कचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणाच नाही.

E-waste disposal of administration | ई-कचऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

ई-कचऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Next

- नामदेव मोरे,  नवी मुंबई
शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणा ई कचऱ्याच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ई - कचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणाच नाही. शास्त्रीय पध्दतीने या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होवू लागले आहेत.
मुंबईमधील देवणार डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीनंतर शहरांमधील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरामधील ओला - सुका कचरा संकलित करणे व त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणारी यंत्रणा निर्माण करण्यात मुंबईसह ठाणे जिल्ह्यामधील महाराष्ट्रामध्ये व नगरपालिकांनाही शक्य झालेले नाही. कचरा टाकण्यासाठी डंपींग ग्राऊंड होत नाही सर्वसाधारण कचऱ्याच्या प्रश्न अद्याप सुटलेला नसताना ई - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नवे आव्हाण शासकीय यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. शहरांसह ग्रामीण भागातली टी. व्ही., रेडीओ, मोबाईल, लँडलाईन फोन, फ्रीज, मिक्सर, संगणक, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर झपाट्याने वाढत आहे. एकट्या बेंगलोर शहरामधून प्रत्येक वर्षी ७ ते ८ हजार टन ई कचरा तयार होत आहे. मुंबई - ठाणे परिसरामध्येही प्रत्येक वर्षी हजारो टन ई - कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने घनकचऱ्यामध्येच ई - कचराही टाकला जात आहे.
प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये ई - कचरा निर्माण होत आहे. नवीन मोबाईल घेतला की जुना कचराकुंडीत टाकला जातो. संगणकापासून इतर अनेक वस्तू भंगार वाल्याला विकल्या जातात.
हा सर्व कचरा अखेर डंपींग ग्राऊंड व शहरांमधील मोकळ्या भूखंडावर टाकला जात असून त्याचे पर्यावरणावर गंभीर परिणाम होवू लागले आहेत.परिणाम होण्याची शक्यता असते.

आरोग्यावर गंभीर परिणाम : ई - कचऱ्यामधील धातू वेगळा करताना ते अ‍ॅसीड टाकून जाळले जातात. कचऱ्यामध्ेय ई - वस्तू टाकल्याने घातक रसायणे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळतात. यामुळे मज्जा संस्था, पुनउत्पादन किडनी, फुफ्फुसे, त्वचा व मेंदूशी संबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

घातक रसायणांचा समावेश
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती करण्यासाठी आर्सेनिक, लिथियम, अ‍ॅटिमनी, शिसे, पारा, कॅडमियन व इतर धातूंचा वापर केला जातो.
पॉलीक्लोरिनेटेड, डायफेनाईल्स, पॉलिकोमिनेटेड बायफेनाईल्स, क्लोरो फ्ल्युरोकार्बन यांचा वापर केला जातो.
अनेक ठिकाणी ई - कचऱ्याचा पुनर्वापर करताना सुट्टे भाग तोडून फोडून सुट्टे भाग वेगळे केले जातात. त्यावर अ‍ॅसिड टाकून तांबे अ‍ॅल्युमिनीयम, चांदी व क्वचित प्रमाणात सोने वेगळे केले जाते.

Web Title: E-waste disposal of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.