भावनिक नात्यांची सांगड घालत प्रचार

By Admin | Published: November 15, 2016 04:45 AM2016-11-15T04:45:46+5:302016-11-15T04:43:55+5:30

नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या ४६ उमेदवारांनी भावनिक नात्याच्या लेबलवर भर दिला आहे. दादा, वहिनी, ताई, मावशी, काका, काकी, आई, आजी, आजोबा, छोटी बहीण अशी भावनिक

Emotional relationships | भावनिक नात्यांची सांगड घालत प्रचार

भावनिक नात्यांची सांगड घालत प्रचार

googlenewsNext

श्रीवर्धन : नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या ४६ उमेदवारांनी भावनिक नात्याच्या लेबलवर भर दिला आहे. दादा, वहिनी, ताई, मावशी, काका, काकी, आई, आजी, आजोबा, छोटी बहीण अशी भावनिक नात्यांची सांगड घालत दिवसभर प्रचार करीत आहेत. नगराध्यक्ष पदाचे तिन्ही उमेदवार ईर्षेला पेटले असून आपणच विजयी होणार, असा दावा करून त्यांनी प्रचारात रंगत आणली आहे.
शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल चौगले, राष्ट्रवादीचे उमेदवार नरेंद्र भुसाणे व भाजपाचे उमेदवार संजीव डेगवेकर यांनी आपणच विजयी होणार असा दावा केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपा या तिन्ही राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन आर्थिक नाडी जुळवत मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आटापिटा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये सुरू आहे. नगरसेवक पदाच्या व नगराध्यक्ष पदाच्या एकाही उमेदवाराने या निवडणुकीत माघार घेतली नाही हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. शिवसेना व भाजपात युती न झाल्यामुळे त्याचा लाभ राष्ट्रवादी उमेदवाराला होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकापची महाआघाडी तर शिवसेना व भाजपा अशी तिरंगी लढत होत आहे.
प्रभाग १ अ मध्ये कामिनी रघुवीर (राष्ट्रवादी), नलिनी चोगले (शिवसेना), सारिका काप(भाजपा) ब मध्ये बाळकृष्ण चाचले ( राष्ट्रवादी), गोविंद भोईनकर (शिवसेना),लक्ष्मण पावसे (भाजपा) प्रभाग २ मध्ये प्रगती पोतदार (राष्ट्रवादी), अंतिमा पडवळ (शिवसेना), अस्मिता खेराडे (भाजपा), ब मध्ये उदय माळी (राष्ट्रवादी), अनंक गुरव (शिवसेना) ,हेमंत गुरव
(भाजपा), प्रभाग ३ अ मध्ये सुबोध पाब्रेकर (राष्ट्रवादी), प्रीतम श्रीवर्धनकर (शिवसेना), मनीषा श्रीवर्धनकर (भाजपा) , ब मध्ये प्रतिभा कांगले (राष्ट्रवादी), मीना वेश्विकर (शिवसेना), स्वाती खापणकर (भाजपा), प्रभाग ४ अ मध्ये दिशा नागवेकर (राष्ट्रवादी), राजश्री मुरकर (शिवसेना), ऊर्मिला लुमण(भाजपा), ब मध्ये वसंत यादव (शेकाप) ,सचिन दिवेकर (शिवसेना), उदय लुमण (भाजपा), प्रभाग ५ अ मध्ये जितेंद्र सातनाक (राष्ट्रवादी), विक्र ांत राऊत (शिवसेना), वसंत चोगले (भाजपा) ब मध्ये रेहमतशकुर आराई (राष्ट्रवादी), सारिका पुलेकर (शिवसेना), व रु पाली राऊत (भाजपा), प्रभाग ६ अ मध्ये नरेंद्र भुसाणे (राष्ट्रवादी), स्वाती ठाकरे (शिवसेना), सुषमा शिद (भाजपा), ब मध्ये यशवंत चौलकर (राष्ट्रवादी), नवनीत तोडणकर (शिवसेना), राजाराम पाटील (भाजपा), प्रभाग ७ मध्ये सीमा गोरनाक(राष्ट्रवादी,) ब मध्ये शिबस्ता सरखोत (राष्ट्रवादी), निशाद कवारे (भाजपा), क मध्ये फैसल हुर्जुक (राष्ट्रवादी) व सिकंदर दिवेकर (भाजपा) हे उमेदवार सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मतदारांचे दरवाजे ठोठावत आहेत. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी अतुल चौगले यांना विजयी करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रचारात सामील झाल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Emotional relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.