तळोजात ‘लढा श्वासासाठी’

By admin | Published: May 4, 2016 12:03 AM2016-05-04T00:03:38+5:302016-05-04T00:23:53+5:30

तळोजा औद्योगिक वसाहतीत असणाºया डम्पिंग ग्राऊंड व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या दोन प्रकल्पापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने या दोन प्रकल्पांविरोधात मंगळवारी भव्य मोर्चाचे

'Fight for breath' in the basement | तळोजात ‘लढा श्वासासाठी’

तळोजात ‘लढा श्वासासाठी’

Next

तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीत असणाºया डम्पिंग ग्राऊंड व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या दोन प्रकल्पापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने या दोन प्रकल्पांविरोधात मंगळवारी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संत वामनबाबा महाराज प्रदूषण विरोधी समितीच्या वतीने सकाळी ११ च्या सुमारास ‘लढा श्वासासाठी’ घोषणांसह सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. तळोजातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता, येथील डम्पिंग ग्राऊंड व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या दोन प्रकल्पांना स्थानिकांचा सर्वाधिक विरोध होत आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जन्माला येणाºया पिढीमध्येही व्याधी उद्भवत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मोर्चासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तळोजातील डंपिंग ग्राऊंड व वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीच्या प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास सिध्दिकरवले, घोट, नितळस, टोंडरे, वाशी देवीचापाडा, पडगे अशा अनेक खेडेगावांना होत असून या गावातील शेती पूर्णपणे नामशेष होऊ लागली आहे. याठिकाणी पूर्वी होत असलेले वांगी, शेवगा, आंबा पिकामध्ये आता फळधारणा होत नसल्याचे येथील शेतकरी बाळाराम पाटील यांनी सांगितले. सरकारने तळोजा येथे होणाºया प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा पुन्हा प्रचंड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बंडामहाराज कराडकर यांनी दिला. सरकारने यावर कोणताही निर्णय न घेतल्यास जून महिन्यात पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आंदोलनात धनाजी पाटील, प्रकाश जंजवाळ, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील, महेंद्र घरत, आर.सी. घरत, बबन पाटील व इतर सर्वपक्षीय मंडळींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर) यावेळी माजी आमदार विवेक पाटील म्हणाले की, प्रकल्पामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय शेतकºयांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होत आहे. आजपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नांना केवळ आंदोलनातूनच न्याय मिळाला असून शेतकरी कामगार पक्ष हा प्रकल्प बंद होण्यासाठी प्रयत्न करेल. - विवेक पाटील, माजी आमदार सर्वपक्षीय लढ्याने तळोजातील प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सुटू शकतो. स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याने हा प्रकल्प हटविण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यासाठी तयार आहोत. - प्रशांत ठाकूर, आमदार

Web Title: 'Fight for breath' in the basement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.