विश्वास मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : लोकसभा निवडणुकांसाठी मावळ लोकसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाकडे नामनिर्देशन पत्र दाखल करताना शैक्षणिक माहिती उमेदवारांनी दिली आहे.
प्रतिज्ञापत्रावरील माहितीनुसार पदव्युत्तर पदवीधारकांचे प्रमाण १७.२४ टक्के, तर पदवीधरांचे प्रमाण ३४.४८ टक्के आहे. तसेच दहावीपर्यंत ४१.३७ टक्के उमेदवार असून, सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांची संख्या ६.६९ टक्के आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघातून ३२ जणांनी ४५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज सादर करताना केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. त्यामध्ये उमदेवाराचे वय, शिक्षण, उत्पन्न, गुन्हे याची माहिती देणे अनिवार्य असते. काही जणांनी आपल्या शिक्षणाचा उल्लेख सविस्तरपणे केलेला नाही. काहींनी शिक्षण हा कॉलम भरलेलाच नसल्याचे दिसून येत आहे. तसेच वयाचा कॉलमही काही उमेदवारांनी अर्जात भरला नसल्याचे दिसून येत आहे.कला, वाणिज्यचे सर्वाधिक पदवीधरमावळ लोकसभा एकूण पदवीधर उमेदवारांमध्ये वाणिज्य आणि कला शाखेचे उमेदवार अधिक आहेत. नवनाथ दुधाळ हे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी बीएस्सी, एमडी असे उच्च शिक्षण घेतले आहे.
वैद्यकीय विधि विषयांत सर्वाधिक पदवीधरएकूण पदवीधर उमेदवारांमध्ये डॉ. मिलिंदराजे भोसले, विजय रंदील, प्रशांत देशमुख, राजाराम पाटील, डॉ. सोमनाथ पोळ, निखिल रामचंद्र हरपुडे, जया पाटील यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच संजय कानडे यांनी एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
उमेदवारांमध्ये तरुणांची संख्या झाली कमीअर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. साठीनंतर नसता उपद्व्याप म्हणून राजकारणात उतरणाºयांची संख्या अर्जदारांत दिसून येत आहे. साठीनंतर अर्ज दाखल करणारे चार उमेदवार आहेत. एकूण पदवीधर उमेदवारांमध्ये दोन जणांची प्रतिज्ञापत्रे अपलोड नाहीत.
कला विषयांतील सर्वाधिक पदवीधरराजेंद्र काटे, अजय लोंढे यांनी पदवीपर्यंत, तर दहावी आणि बारावीपर्यंत पंढरीनाथ पाटील, भीमराव कुडाळे, धर्मपाल तंतरपाळे, प्रकाश महाडिक, राकेश चव्हाण, बाळकृष्ण घरत, सुरेश तौर, जाफर चौधरी, गोपाळ बोधे, नूरजहा शेख यांनी शिक्षण घेतलेले आहे.प्रमुख पक्षांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारउच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. प्रमुख पक्षांपैकी राष्टÑवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचे शिक्षण बीकॉम आहे. वंचित आघाडीचे राजाराम पाटील हे वैद्यकीय पदवीधर, बसपाचे संजय कानडे यांचे शिक्षण एलएलबी, शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचे शिक्षण दहावीपर्यंत, हिंदुस्थान जनता पक्षाचे भीमराव कुडाळे यांचे शिक्षण दहावीपर्यंत, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश महाडिक यांचे शिक्षण नववीपर्यंत, बळीराजा पक्षाचे संभाजी गुणाट यांचे शिक्षण नववीपर्यंत, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे मदन पाटील यांनी शिक्षण दिलेच नाही. क्रांतिकारी जयहिंद सेनेचे जगदीश सोनवणे यांचे बीकॉमपर्यंत, तर बहुजन रिपब्लिकन पार्टीचे सुनील गायकवाड यांचे शिक्षण दहावीपर्यंत आहे.