नवीन पनवेलमध्ये रविवारी आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:16 AM2017-11-11T01:16:46+5:302017-11-11T01:16:56+5:30
अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल, हिरानंदानी हेल्थ केअर प्रा.लि. वाशी व उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नवीन पनवेलमध्ये
पनवेल : अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल, हिरानंदानी हेल्थ केअर प्रा.लि. वाशी व उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नवीन पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे माध्यम प्रायोजक लोकमत आहे.
नवीन पनवेल येथील बस स्थानकाजवळील ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर रविवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमल, उपमहापौर चारु शीला घरत, बांधकाम सभापती अॅड. मनोज भुजबळ व स्थायी समिती सदस्य तेजस कांडपिळे उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात मधुमेह तपासणी, ई.सी.जी., बी.एम.आय. तपासणी, रक्तदाब तपासणी, नेत्रचिकित्सा व नंबर काढण्यात येणार आहेत व मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अध्यक्ष प्रकाश विचारे, डी.जी.मगरे, यादवराव मेश्राम, गोपाळ धारपवार, सचिव साहेबराव जाधव व खजिनदार रमेश धामणे यांनी केले आहे.