खारघरमध्ये गाई चोरीच्या घटनांत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 02:23 AM2019-01-08T02:23:10+5:302019-01-08T02:23:26+5:30
खारघरमधील गो शाळा चालक शैलेश खोतकर यांना या प्रकाराबद्दल ओवे कॅम्पमधील रहिवाशांनी माहिती दिली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन गायीवर प्राथमिक उपचार केले.
पनवेल : खारघर शहरात गेल्या काही दिवसांपासून गायी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी ओवे कॅम्प परिसरात अशीच एक घटना घडली. गायीला चोरण्यासाठी चोरट्यांनी तिला गुंगीचे औषधही दिले होते.
खारघरमधील गो शाळा चालक शैलेश खोतकर यांना या प्रकाराबद्दल ओवे कॅम्पमधील रहिवाशांनी माहिती दिली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन गायीवर प्राथमिक उपचार केले. दोन महिन्यापूर्वी खोतकर यांच्या गो शाळेतही चोरीचा प्रकार घडला होता. यासंदर्भात त्यांनी तक्रारही केली होती. सध्या गो हत्येवर बंदी असल्याने गो शाळा, तसेच मोकाट गायी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात खोतकर यांनी आवाज उठवला मात्र गो हत्या करणाऱ्यांकडून खोतकर यांना त्रास देण्यात येत आहे. गायी चोरणाºयांवर कारवाई करण्याची मागणी खोतकर यांनी केली आहे.