महागाईमुळे गरिबांना जगणे अवघड, शरद पवारांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 02:35 AM2017-09-26T02:35:52+5:302017-09-26T02:35:59+5:30

भाजपा सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे. गरीब, कष्टकरी जनतेला जीवन जगणे अवघड झाले आहे. सरकारच्या धोरणांमुळे देशातील कामगार असुरक्षित बनला असल्याची टीका, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

It is difficult for the poor to live due to inflation, Sharad Pawar's explanation | महागाईमुळे गरिबांना जगणे अवघड, शरद पवारांची स्पष्टोक्ती

महागाईमुळे गरिबांना जगणे अवघड, शरद पवारांची स्पष्टोक्ती

Next

नवी मुंबई : भाजपा सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे. गरीब, कष्टकरी जनतेला जीवन जगणे अवघड झाले आहे. सरकारच्या धोरणांमुळे देशातील कामगार असुरक्षित बनला असल्याची टीका, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ठोस भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८४व्या जयंतीनिमित्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये कामगार मेळावा आयोजित केला होता. त्या वेळी पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. आतापर्यंत महाराष्ट्रातील कामगार चळवळीने देशाला मार्गदर्शन केले, पण भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील कामगार असुरक्षित बनला आहे. बाजार समिती कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केला जात असून, त्याचा सर्वाधिक फटका माथाडी कामगारांना बसणार आहे. मुख्यमंत्री मेळाव्याला आले असते, तर कामगारांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील व देशातील वर्तमान स्थिती पाहून भीती वाटू लागली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीबरोबर महागाईही वाढली आहे. सामान्य नागरिकांना जीवन जगणे अवघड झाले आहे. बेकारी वाढली असून, महागाई व बेरोजगारीसह सरकारच्या धोरणांविरोधात ठोस भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
नाशिकमधील माथाडी कामगारांच्या लेव्हीचा प्रश्न सोडविण्यासाठी, पुढील आठवड्यामध्ये नाशिकमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच सहकार्य केले असल्यामुळे, कामगारांच्या वतीने त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन केल्याचे मत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
या वेळी राष्ट्रवादी काँगे्रसचे
प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, प्रसाद लाड, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

देशभरातील कामगार असुरक्षित
शरद पवार यांनी भाजपा सरकारच्या कामगारविषयी धोरणांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील कामगार चळवळ यापूर्वी देशाला मार्गदर्शन करत होती, परंतु या सरकारमुळे कामगार असुरक्षित झाला आहे. बाजार समिती कायदाही रद्द करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याचा फटका माथाडी कामगारांना बसणार आहे. कामगारांचे हक्क त्यांना मिळणार नाहीत. कारखान्यांसह सर्वच ठिकाणी ठेकेदारी (काँट्रॅक्ट) पद्धतीला चालना दिली जात असून, त्यामुळे कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सरकारी धोरणे बदल असून, कामगार दिवसेंदिवस असुरक्षित होत आहे. बेरोजगारी वाढू लागली असल्याची टीकाही शरद पवार यांनी या वेळी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी फिरविली पाठ
माथाडी मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहाणार होते. शरद पवार व फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे, कामगारांत उत्सुकता होती. कामगारांनी मेळाव्यासाठी प्रचंड गर्दी केली होती, पण मुख्यमंत्री मुख्यमंत्री महत्त्वाच्या कामानिमित्त दिल्लीला गेल्याने, मेळाव्याला आले नसल्याचे स्पष्टीकरण आमदार नरेंद्र पाटील यांनी या वेळी केले.

Web Title: It is difficult for the poor to live due to inflation, Sharad Pawar's explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.