कॅश लोडिंगमधून लाखोंचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 06:04 AM2017-11-13T06:04:44+5:302017-11-13T06:04:57+5:30
एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याचे काम करणार्या दोन कर्मचार्यांनी तब्बल ३१ लाख १७ हजार ४00 रु पयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दीपक जाधव (२४) आणि रोहित गायकवाड (२३) अशी दोघा कॅश लोडिंग कर्मचार्यांची नावे असून, पनवेल शहर पोलिसांनी या दोघांना अपहाराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याचे काम करणार्या दोन कर्मचार्यांनी तब्बल ३१ लाख १७ हजार ४00 रु पयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दीपक जाधव (२४) आणि रोहित गायकवाड (२३) अशी दोघा कॅश लोडिंग कर्मचार्यांची नावे असून, पनवेल शहर पोलिसांनी या दोघांना अपहाराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
दीपक जाधव आणि रोहित गायकवाड हे दोघेही मुलुंड पश्चिम भागात राहाण्यास असून, ते मागील चार महिन्यांपासून पनवेलच्या तक्का भागातील सेक्युरिट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कॅश लोडिंग ऑफिसर म्हणून काम करत होते. सेक्युरिट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी विविध बँकांच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याचे काम करते. दीपक आणि रोहित या दोघांवर मुलुंड, भांडुप, विक्र ोळी आणि घाटकोपर या भागातील अँॅक्सीस बँक तसेच पीएनबी बँकेच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी होती. दरम्यान, सेक्युरिट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी देण्यात आलेल्या रकमेपैकी काही रक्कम हे दोघेही परस्पर काढून घेऊन उर्वरित रक्कम एटीएम मशिनमध्ये भरत होते. अशा पद्धतीने या दोघांनी ४ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३१ लाख १७ हजार ४00 रु पयांची रक्कम काढून त्या रकमेचा अपहार केला. कंपनीच्या ऑडिटमध्ये हा प्रकार उघड झाला.