शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

पनवेलमधील मोरबे धरणाला गळती

By admin | Published: May 05, 2016 1:14 AM

मोरबे धरणाच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

पनवेल : मोरबे धरणाच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.पनवेल तालुक्यातील खैरवाडी- गारमाळ परिसरात वसलेले हे मोरबे धरण जवळपास ५० एकर जमिनीवर आहे. या धरणाचे पाणी आजूबाजूच्या गावातील शेतीसाठी तसेच मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांना पिण्यासाठी वापरले जाते. ३.२२ दशलक्ष घनमीटर या धरणाची क्षमता असून ३.१२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असतो. तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. सद्यस्थितीत पनवेलमधील ३६ गावे -वाड्यामध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे. येथील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे आणि मोरबे धरणातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. कित्येक महिन्यांपासून धरणाच्या दुरु स्तीकडे पाटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मोरबे धरणात पहिल्यांदाच पिंजरा पालन पद्धतीद्वारे मत्स्यव्यवसाय करण्यात येत आहे. ही पद्धत नवीन असून या मत्स्य प्रकल्पामुळे येथील पाणी प्रदूषित झाले असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. धरणातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे बाजूला खड्डा खोदून त्यातून पिण्यासाठी पाणी नेता येत नसल्याचे आदिवासी बांधव सांगतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या फोडून काचा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. एकंदरीत धरण परिसरात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने धरणाला लागलेली गळती व दुर्गंधी थांबवावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे. (प्रतिनिधी)यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. ते तपासणीसाठी कोलाड व ठाणे येथील कार्यालयात पाठविण्यात आले आहे. त्यानंतरच धरणाच्या दुरु स्तीला सुरुवात करण्यात येईल.- निकीता महाडिक, शाखा अभियंता,पाटबंधारे विभाग, पनवेल