वाढत्या वाहनांमुळे वाहतुकीचा बोजवारा, नवी मुंबईत तब्बल साडेचार लाख वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:28 AM2018-01-30T07:28:25+5:302018-01-30T07:28:33+5:30

वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरातील वाहनांच्या संख्येत देखील कमालीची वाढ होत आहे. याचा परिणाम दळणवळण यंत्रणेवर होत आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असतानाही खासगी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे.

 More than half a million vehicles in Navi Mumbai, due to the increasing vehicular traffic, have been destroyed | वाढत्या वाहनांमुळे वाहतुकीचा बोजवारा, नवी मुंबईत तब्बल साडेचार लाख वाहने

वाढत्या वाहनांमुळे वाहतुकीचा बोजवारा, नवी मुंबईत तब्बल साडेचार लाख वाहने

Next

-सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरातील वाहनांच्या संख्येत देखील कमालीची वाढ होत आहे. याचा परिणाम दळणवळण यंत्रणेवर होत आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असतानाही खासगी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे.
२१ व्या शतकातले शहर म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईला वाहतूककोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. त्यावर वेळीच तोडगा न काढल्यास दिल्लीपेक्षा वाईट परिस्थिती नवी मुंबईतल्या रस्त्यांवर उद्भवू शकते. सद्यस्थितीला नवी मुंबई आरटीओकडील आजपर्यंतच्या वाहनांच्या नोंदणीचा आकडा ४ लाख ६० हजारांच्या घरात पोचला आहे. त्यामध्ये डिसेंबर २०१७ पर्यंतच्या नोंदीत २ लाख २३ हजार ६७२ दुचाकी, १ लाख ३५ हजार १९७ कार, १६ हजार ९५० रिक्षा व १४ हजार ४८१ मीटर टॅक्सींचा समावेश आहे. त्यापैकी २२,०३४ दुचाकी व १०,३२२ कारची नोंदणी गतवर्षी झालेली आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे रस्त्यावर जागोजागी वाहतूककोंडी वाढत चालली आहे.
राज्याची आर्थिक राजधानी मुंबईतल्या वाढत्या घरांच्या किमतीमुळे वास्तव्यासाठी नवी मुंबईचा पर्याय निवडला जात आहे. यामुळे देशाच्या कानाकोपºयातून आलेल्यांचा लोंढा नवी मुंबईत स्थिरावत आहे. अशातच शहरात उभारी घेत असलेल्या आयटी क्षेत्रामुळे भरघोस पगारांच्या नोकºया उपलब्ध होवून दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यांच्याकडून गरज अथवा प्रतिष्ठा म्हणून वाहन खरेदीवर भर दिला जात असल्याने घरटी किमान एक दुचाकी व कार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळात नवी मुंबईत दळणवळणासाठी ट्रेन, बेस्ट, एनएमएमटी, रिक्षा असे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय असतानाही अनेकांकडून खासगी वाहनांचा वापर होत आहे. शहरातील सुमारे १५ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ९ लाख लोक प्रतिदिन कोणत्या ना कोणत्या कारणाने जवळ, लांबचा प्रवास वाहनाने करतात. तीन लाख प्रवासी एनएमएमटीने तर सुमारे दोन लाख प्रवासी बेस्टने प्रतिदिन प्रवास करतात, तर साधारण दीड लाख प्रवाशांकडून रिक्षाचा पर्याय निवडला जातो. उर्वरित निम्म्याहून अधिक प्रवाशांकडून खासगी वाहनांचा वापर होत असल्याने महत्त्वाच्या मार्गांवर, चौकांमध्ये, सिग्नलच्या ठिकाणी सतत वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे.
वाढत्या वाहतूककोंडीमुळे घाईमध्ये अनेक जण वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत आहेत. यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, वाहतूक पोलिसांवरही ताण वाढत आहे. वाढता वाहतुकीचा हा बोजवारा नियंत्रित करण्यासाठी वाढत चाललेल्या वाढती खासगी वाहनांची संख्या नियंत्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याबाबत जनजागृतीचीही आवश्यकता भासत आहे, अन्यथा येत्या काळात वाहतूककोंडीच्या बाबतीत नवी मुंबई दिल्लीला मागे टाकण्याची शक्यता आहे.

च्प्रशासनाकडून शहरात स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक वाहनांच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. यामुळे वाहनांच्या धुरामुळे होणाºया प्रदूषणालाही आळा बसेल. त्याकरिता अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनीही सार्वजनिक वाहनांमधून प्रवासात पुढाकार घेण्याची गरज आहे.
च्प्रवाशांच्या सोयीसाठी पालिकेकडून एनएमएमटी सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीला एनएमएमटीच्या ताफ्यात ४६५ बस असून वेगवेगळ्या ७५ मार्गांवर त्या चालवल्या जात आहेत. त्यामधून प्रतिदिन सुमारे ३ लाख प्रवासी शहराअंतर्गत अथवा शहराबाहेर प्रवास करतात.
च्सार्वजनिक वाहनांऐवजी एकट्या व्यक्तीकडूनही प्रवासासाठी दुचाकी अथवा कारचा अशा खासगी वाहनांचा वापर होत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या वाढून वाहतूककोंडी होत आहे. भविष्यात ही वाहतूककोंडी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने खासगी वाहनांच्या वापरावर मर्यादा घालणे काळाची गरज बनले आहे.

शहरात एकूण वाहनांची नोंद : 4,56,159

Web Title:  More than half a million vehicles in Navi Mumbai, due to the increasing vehicular traffic, have been destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.