- अरूणकुमार मेहत्रे
कळंबोली : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणाने तपासात वेगळे वळण घेतले आहे. अभय कुरूंदकराचा मित्र आणि खाजगी चालकाला अटक केल्यानंतर हा खून असल्याचा पोलिसांच्या संशयाला बळ मिळाले आहे. गुरूवारी या दोनही आरोपींना न्यायालयात उभे करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी ही माहिती सादर करीत पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.कुंदन भंडारी हा अभय कुरुंदकर यांचा २० वर्षापासून खाजगी ड्रायव्हर आहे. आणि महेश पळणीकर हा बालमित्र आहे . अश्विनी गायब झाल्या त्या दिवशी म्हणजेच ११ आणि १२ एप्रिल २०१६रोजी चारही आरोपी सीडीआरमध्ये एकत्र आढळून आले .त्यानुसार कुरूंदकरचा चालक आणि मित्राला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली होती. लाकूड कापण्याच्या कटर मशिनने अश्विनीचे तुकडे करुन गोणीत भरुन वसई खाडीत फेकले, अशी माहिती पळणीकरांकडे केलेल्या तपासातून पुढे आले आहे, असा दावा तपास यंत्रणेने गुरूवारी न्यायालयात केला. हे हत्यार पोलिसांना अध्याप भेटले नाही त्याचा शोध सुरू असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. पोलिसांनी या प्रकरणातील चारही आरोपींवर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर अपहरण, पुरावा नष्ट करणे , हे आरोप सुध्दा आरोपींवर आहेत.