Navi Mumbai: कोपरखैरणे येथील युवतीने वैमानिक परीक्षेच्या खडतर अभ्यासक्रमात यश मिळविले
By नारायण जाधव | Published: July 8, 2023 12:42 PM2023-07-08T12:42:37+5:302023-07-08T12:42:56+5:30
Navi Mumbai: जागृती रोहिदास पाटील या कोपरखेरणे येथील युवतीने मध्यप्रदेशात वैमानिक प्रशिक्षण घेतले आहे . या प्रशिक्षण यशस्वी रित्या झाल्यावर या युवतीचे कोपरखैरणे येथे आगमन झाले आहे.
नवी मुंबई - जागृती रोहिदास पाटील या कोपरखेरणे येथील युवतीने मध्यप्रदेशात वैमानिक प्रशिक्षण घेतले आहे . या प्रशिक्षण यशस्वी रित्या झाल्यावर या युवतीचे कोपरखैरणे येथे आगमन झाले आहे. 20 तास विमान चालविले आहे .आणि यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच परिक्षा यशस्वीरीत्या पार केली आहे.वैमानिक म्हणून तिला परवाना मिळाला आहे. आता सध्या एअर इंडिया या वैमानिक कंपनीत पुढील सेवा देण्याचा मानस तिने व्यक्त केला असून बारावी नंतर मध्यप्रदेश येथील गुना येथे हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
प्रशिक्षक पंधरा तसा तिच्या सोबत राहून तांत्रिक प्रशिक्षण द्यायचे. कोव्हिड काळ पकडुन सुमारे चार वर्ष प्रशिक्षण घेतल्यावर ती पुन्हा परतली आहे.महाराष्ट्रातून एकमेव मुलगी म्हणून तिने या प्रशिक्षण संस्थेत सहभाग घेतला होता.तर नवी मुंबई शहरातील पहिली महिला वैमानिक प्रशिक्षण पूर्ण करणारी तरुणी ठरली आहे.सुमारे सतरा हजार फूट उंचीवर विमान उडविण्याचे प्रशिक्षण या युवतीने घेतले आहे.पालकांनी मुलगी असल्याने वेगळे काही तरी करण्यासाठी नेहमीच प्रतिसाद दिला.आता प्रशिक्षण पूर्ण झाल्याने नवी मुंबई शहरातील पहिली महिला वैमानिक म्हणून जागृती सज्ज झाली आहे.