नवी मुंबई विमानतळाचे कामकाज केले ठप्प, ग्रामस्थांनी केला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 03:43 PM2018-02-13T15:43:48+5:302018-02-13T15:45:20+5:30
नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजाच्या ठेक्यापासून पारगाव दापोली ग्रामस्थांना वंचित ठेवल्यामुळे आज संतापलेल्या पारगाव ग्रामस्थांनी मोर्चा काढून विमानतळाचे कामकाज ठप्प केले.
भालचंद्र जुमलेदार
पनवेल : नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजाच्या ठेक्यापासून पारगाव दापोली ग्रामस्थांना वंचित ठेवल्यामुळे आज संतापलेल्या पारगाव ग्रामस्थांनी मोर्चा काढून विमानतळाचे कामकाज ठप्प केले. या वेळी ग्रामस्थच्या सोसायटींना काम द्यावे अशी मागणी केली. दोन दिवसात या संदर्भात निर्णय घेतला नाही तर नवी मुबई विमानतळाचे काम पुन्हा बंद पाडू असा इशारा देण्यात आला.
या सोबत विमानतळ बाधिंतामध्ये पारगाव वगळण्यात आल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत, विमानतळ बाधितांमध्ये पारगावचा समावेश करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. नवी मुबई विमानतळाच्या कामकाजाप्रसंगी पारगाव गावाच्या सर्व बाजूंनी भराव केल्यामुळे गाव खड्यात गेले आहे याचा फटका पावसाळ्यात पारगाव ग्रामस्थांना बसणार आहे.