शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नामकरणाचा ठराव होऊनही अंमलबजावणी नाही

By admin | Published: May 04, 2016 12:11 AM

आग्रोळी गावात महापालिकेच्या वतीने समाजमंदिर उभारण्यात आले आहे. या समाजमंदिराला कै. लक्ष्मण कृष्णा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पारित

नवी मुंबई : आग्रोळी गावात महापालिकेच्या वतीने समाजमंदिर उभारण्यात आले आहे. या समाजमंदिराला कै. लक्ष्मण कृष्णा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पारित केला होता. परंतु सात वर्षांचा काळ उलटला तरी त्याची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत.आग्रोळी गावचे माजी पोलीस पाटील तसेच शिक्षणप्रेमी लक्ष्मण कृष्णा पाटील हे गावातील एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. आग्रोळीतील ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना त्यांनी रुजवली व जोपासली. गावात गणपतीचे मंदिर उभारण्यासाठी स्वत:ची जागा दान केली. शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे लक्ष्मण कृष्णा पाटील यांचे नाव गावातील समाज मंदिराला द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार माजी नगरसेवक अशोक भाऊ पाटील यांनी महासभेत हा ठराव मांडला होता. या ठरावाला २0 जुलै २00९ रोजीच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती. तर तत्पूर्वी ८ आॅगस्ट २00९ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतसुध्दा हा ठराव मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यानंतर २१ फेब्रुवारी २0१0 रोजी महापालिकेच्या वतीने नामकरण समारंभही घेण्यात आला होता. परंतु लक्ष्मण कृष्णा पाटील यांच्या नावाचे फलक मात्र लावले नाही. मंजूर झालेल्या ठरावानुसार समाजमंदिराला फलक लावावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. काँग्रेसचे बेलापूर विधानसभा क्षेत्र जनरल सेक्रेटरी सुधीर पाटील यांनी अलीकडेच महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेवून मंजूर झालेल्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी पाटील यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.