विजेचे खांब तोडप्रकरणी गुन्हा
By admin | Published: November 16, 2016 04:46 AM2016-11-16T04:46:38+5:302016-11-16T04:46:38+5:30
महानगरपालिकेने नेरुळ पामबीच मार्गालगत उभारलेल्या ज्वेल आॅफ नवी मुंबई या पर्यटनस्थळाच्या परिसरात उभारलेल्या सुशोभित
नवी मुंबई : महानगरपालिकेने नेरुळ पामबीच मार्गालगत उभारलेल्या ज्वेल आॅफ नवी मुंबई या पर्यटनस्थळाच्या परिसरात उभारलेल्या सुशोभित एल.ई.डी. फिटिंगच्या २२५ विद्युत पोलपैकी ३५ विद्युत पोलची शनिवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी मोडतोड केल्याचा प्रकार घडला. या गुन्हातील अज्ञात व्यक्ती व सुरक्षा रक्षकांविरोधात नेरुळ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याघटनेदरम्यान याठिकाणी ४ सुरक्षारक्षक रात्री १० ते सकाळी ७ वेळेत कार्यरत होते. कर्तव्यावर कार्यरत असणाऱ्या ४ सुरक्षारक्षकांनी आपले कर्तव्य पार न पाडल्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेची आर्थिक हानी झाल्याचे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर विभाग अधिकारी यांनी विद्युत पोल्सची मोडतोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तसेच त्या वेळी सुरक्षारक्षक बोर्ड, मुंबई या संस्थेमार्फत त्याठिकाणी मालमत्तेच्या संरक्षणाकरिता कार्यरत असणाऱ्या त्या पाळीतील ४ सुरक्षारक्षकांविरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.