नवी मुंबई : सीबीडी येथील अग्निशमन कर्मचाºयांचेच जीव धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. तिथल्या कर्मचाºयांची निवासी इमारत जीर्ण झाली असून, जागोजागी पडझड सुरू आहे. त्यामुळे जीवाचा तसेच आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याने २३ कुटुंबे जीव मुठीत धरून राहत आहेत.पालिकेच्या वतीने सीबीडी येथील अग्निशमन कर्मचाºयांसाठी निवासी इमारत उभारण्यात आली आहे. ही इमारत अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभी आहे. यानंतरही इमारतीचा वापर होत असल्याने जागोजागी पडझड सुरू आहे. तर काही शौचालयांचे दरवाजेही तुटले आहेत. तर मलनि:सारण वाहिन्याही तुंबल्याने त्यामधून वाहनारे दूषित पाणी पसिरात पसरत आहे. त्यातूनच अग्निशमन दलाचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना चालावे लागत आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याशिवाय इमारतीची पडझड सुरू असल्याने त्याचा एखादा मोठा भाग कोसळून दुर्घटना घडल्यास जीवितहानीही होऊ शकते. त्यामुळे भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस संजय पवार यांनी यासंबंधी पालिकेकडे तक्रार केली आहे. वेळीच अग्निशमन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास होणाºया हानीला प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंबंधीचे पत्र पवार यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
अग्निशमन कर्मचाऱ्यांचेच जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:04 AM