पनवेल : अश्विनी बिद्रे कडे सापडलेल्या पत्राचे कुरुंदकरशी संबंध काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 07:48 PM2017-12-15T19:48:02+5:302017-12-15T20:36:09+5:30
अश्विनी बिद्रे यांनी लिहलेले पत्र पोलिसांच्या हाती लागेल असून त्या पत्रात माझे हात पाय तोडून मला ठार करण्याची तुझी ईच्छा पूर्ण होवो असे स्पष्ट पणे लिहले आहे . या पत्राचे आणि कुरुंदकरचे काय संबधीत आहे ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत .
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : बेपत्ता अश्विनी बिद्रे प्रकरणात नवीन नवीन गोष्टी पोलीस तपासात उघड होत आहेत . या प्रकरणात अभय कुरुंदकर आणि राजू पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे . आज शुक्रवारी पनवेल न्यायालयाने दोन्हीही आरोपीना १९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . मात्र या प्रकरणात अश्विनी बिद्रे यांनी लिहलेले पत्र पोलिसांच्या हाती लागेल असून त्या पत्रात माझे हात पाय तोडून मला ठार करण्याची तुझी ईच्छा पूर्ण होवो असे स्पष्ट पणे लिहले आहे . या पत्राचे आणि कुरुंदकरचे काय संबधीत आहे ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत .
कुरुंदकर पोलीस अधिकारी असल्याने या प्रकरणात पोलीस तपासात विविध अडथळे निर्माण होत आहेत . अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी देखील हि माहिती आज पत्रकारांना दिली . दिड वर्षांपासून अभय कुरुंदकर संशयित आरोपी असताना त्याचे नावे २०१७ च्या राष्ट्रपती पदकासाठी कसे काय पुढे येते ? याबाबत देखील गोरे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले . पोलिसांनी देखील या प्रकरणातील अधिक तपासासाठी न्यायालयासमोर विविध बाजू मांडल्या आहेत . या प्रकरणी संशयित आरोपींची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे .
या प्रकरणात कुरुंदकर पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसल्याचे उघड झाले आहे . अद्याप या प्रकरणाचा काहीच छडा लागत नसून ज्या दिवसापासून अश्विनी बेपत्ता आहेत .ठाणे रेल्वे स्थानकावर कुरुंदकर यांची भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे . यावेळी काही वेळ कुरुंदकर,बेपत्ता अश्विनी बिद्रे व राजू पाटील यांचे मोबाईल लोकेशन एकच परिसरात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.