स्वच्छता अभियानात रंगरंगोटीची निकृष्ट कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:19 AM2019-01-08T02:19:53+5:302019-01-08T02:20:07+5:30

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : धूळ साफ न करताच पदपथासह दुभाजकांचे रंगकाम

Rampant work in cleanliness campaign | स्वच्छता अभियानात रंगरंगोटीची निकृष्ट कामे

स्वच्छता अभियानात रंगरंगोटीची निकृष्ट कामे

Next

नवी मुंबई : स्वच्छता अभियानासाठी महापालिकेने शहरातील पदपथासह दुभाजकांना रंग देण्यास सुरवात केली आहे. साफसफाई न करताच रंग देऊन पालिकेसह शहरवासीयांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने तीन वर्षांपासून स्वच्छता अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यास सुरवात केली आहे. शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांसह उद्यान, होल्डिंग पाँडच्या संरक्षण भिंतींना रंग लावण्यात येत आहे.

दुभाजक व पदपथाचे कर्बस्टोन यांनाही पिवळे व काळे पट्टे मारले जात आहेत. हे पट्टे मारताना दुभाजक व पदपथाचे कर्बस्टोन धुवून घेणे आवश्यक आहे. परंतु काम करणारे कामगार फक्त झाडूने धूळ झाडल्यासारखे करत आहेत. प्रत्यक्षात धूळ असलेल्या कर्बस्टोनवरच रंगकाम केले जात आहे. संरक्षण भिंतीवर चित्रे काढतानाही योग्य काळजी घेतली जात नाही. निकृष्ट पद्धतीने रंगकाम सुरू असताना त्यावर महापालिकेच्या अधिकाºयांचे लक्ष नाही. कामावर देखभाल करणारी यंत्रणाच नाही. यामुळे रंग काही दिवसात उडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कामचुकारपणा करणाºया ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी ५०० हून अधिक सार्वजनिक शौचालयांची सोय

च्स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता नागरिकांनी त्याची दैनंदिन सवय म्हणून आत्मसात करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
च्घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात महापालिकेला गतवर्षी देशात सर्वोत्तम शहराचा सन्मान मिळाला आहे. त्यानुसार २०१९ च्या स्वच्छता सर्वेक्षणातही नावलौकिक मिळवण्याचा प्रयत्न नवी मुंबई महापालिकेकडून सुरु आहे. त्याकरिता प्रशासनासोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याकरिता महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबवून, नागरिकांना स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न ठेवता, त्याची दैनंदिन सवय लावून घेण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न करता स्वयंस्फूर्तीने घरातच ओला व सुक्या कचºयाचे वर्गीकरण करून तो कचरागाडीत जमा करण्यासही सुचवले जात आहे.
च्यापूर्वी हागणदारीमुक्त शहर अभियान राबवून उघड्यावर शौच करणाºयांवर कारवाया केल्या आहेत. तर हे अभियान यशस्वीरीत्या राबवले जावे याकरिता शहरात ५०० हून अधिक ठिकाणी सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निगा राखण्यासह सामानांची मोडतोड होणार नाही याची नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यातर्फे सातत्याने केले जात आहे.
 

Web Title: Rampant work in cleanliness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.