विमानतळबाधित खारफुटीचे पुनर्राेपण, सिडकोच्या समन्वयाने वनविभागाचा उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 07:10 AM2018-01-31T07:10:29+5:302018-01-31T07:10:33+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती आली आहे. सिडकोने युद्धपातळीवर काम सुरू करून दोन ते तीन वर्षांत नवी मुंबईमधील पहिले विमान टेकआॅफ घेण्याचा दावा केला आहे. विमानतळाच्या कामामुळे परिसरातील खारफुटीची कत्तल होणार आहे.
-वैभव गायकर
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती आली आहे. सिडकोने युद्धपातळीवर काम सुरू करून दोन ते तीन वर्षांत नवी मुंबईमधील पहिले विमान टेकआॅफ घेण्याचा दावा केला आहे. विमानतळाच्या कामामुळे परिसरातील खारफुटीची कत्तल होणार आहे. विमानतळ क्षेत्रात उलवे परिसरातील ११.४ चौरस कि.मी. (१ हजार १४२ हेक्टर) जमीन विमानतळासाठी संपादित केली जाणार आहे. या जमिनीपैकी १५० हेक्टर जमिनीवर खारफुटी आहे. ११८ हेक्टर जमिनीवर जलवनस्पती आहेत, तसेच नद्यांची नैसर्गिक पात्रे वळवावी लागणार आहेत. भरावामुळे नष्ट होणाºया खारफुटीला पर्याय म्हणून सिडकोने वनविभागाच्या मदतीने नव्या खारफुटी रोपणाला सुरु वात केली आहे.
खांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरातील सिडकोच्या मालकीच्या जागेवर या कामाला सुरुवात झाली आहे. अद्याप १६० हेक्टरवर खारफुटीची लागवड केल्याचा दावा वनविभागाने केला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाला परवानगी देताना खारफुटीला बसणारा फटका लक्षात घेता, पर्यावरण विभागाने संपादित खारफुटीच्या जागेपेक्षा दुप्पट जागेत खारफुटीची लागवड करण्याची अट घातली होती. त्यानुसार सिडकोने सुमारे ३१० हेक्टर जागा खारफुटीसाठी आरक्षित ठेवली असून, लागवड, संवर्धनानाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन नवी मुंबई यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या खारफुटीच्या लागवडीला सुरु वात झाली असून, दोन वर्षांत काम पूर्ण होणार असल्याचा दावा नवी मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन प्रकाश चौधरी यांनी केला आहे. या संदर्भात विशेष उपाययोजना राबवून लागवडीचे काम सुरू करण्यात आले आहे. ३१०पैकी १६० हेक्टरवर खारफुटी रोपणाची प्रक्रि या पूर्ण झाली आहे.
सिडको आणि वनविभागामध्ये झालेल्या करारानुसार ही लागवड करण्यात आली आहे. सिडकोने वनविभागाला लागवडीसाठी दिलेल्या खाडी क्षेत्रातील जागेत हायझोफोरेसी, कंटेलिया कँडल, अँपेयीम मरिया, सिम सिरीअप सॉगल आदी प्रजातीच्या खारफुटीची सध्या लागवड सुरू आहे. याकरिता संबंधित जागेत पाणी येण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे नाले तयार केले जात आहेत. या कॅनलमार्फत लागवड केलेल्या क्षेत्रात खाडीतून येणारे पाणी आपोआप खारफुटीला मिळून त्यांची नैसर्गिक वाढ होणार आहे. ही लागवड अशा पद्धतीने करण्यात येणार आहे की, या क्षेत्रात घुसलेले पाणी ओहोटीच्या वेळी पुन्हा खाडीत जाईल. याकरिता विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांनी दिली.
सिडको विभागीय कार्यालयाला माहिती नसल्याने संभ्रम
खारफुटीच्या लागवडीबाबत वनविभागाने सिडकोच्या स्थानिक विभागीय अधिकाºयांना कल्पना दिली नव्हती. त्यामुळे सोमवारी खांदेश्वर परिसरातील खारफुटीची कत्तल होत असल्याचा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ती खारफुटीची नव्हे तर त्यातील काटेरी झुडपांची कत्तल होती. सिडकोचे विभागीय अधिकारी सी. डी. माने यांनी खारफुटीसंदर्भात कामाची वनविभागाच्या मार्फत स्थानिक सिडको कार्यालयाला कल्पना देणे गरजेचे होते.
सिडकोने वनविभागाशी केलेल्या करारानुसार ३१० हेक्टरमध्ये कांदळवनाच्या रोपट्यांची लागवड सुरू आहे. सद्यस्थतीला १६० हेक्टरमध्ये ही लागवड करण्यात आली आहे. उर्वरित जागेवर दोन वर्षांत संपूर्ण लागवडीचे काम पूर्ण होईल. याकरिता विशेष तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. कांदळवनाच्या लागवडीसाठी नवी मुंबईमधील ठरावीक नर्सरींमध्ये बियांची निर्मिती केली गेली आहे. पुढील दोन वर्षांत ही लागवड पूर्ण होईल.
- प्रकाश चौधरी,
वनपरिक्षेत्र अधिकारी,
कांदळवन, नवी मुंबई
जमिनीची धूप रोखणारी खारफुटी
खारफुटी पाणथळ, घट्ट माती नसलेल्या जागी, भरतीचे पाणी घुसणाºया भागात वाढते. खारफुटीमुळे जमिनीची धूप थांबते. भारतामध्ये सर्वात जास्त खारफुटीचे जंगल पूर्वकिनारपट्टीवर सुंदरबन येथे आहे. तर पश्चिम किनारपट्टीवरील गुजरात राज्यात दुसºया क्र मांकाचे खारफुटीचे जंगल आहे. जगभरात एकूण ७३ खारफुटी वनस्पतीच्या जाती आहेत. तर त्यापैकी भारतात ४६ प्रकारच्या प्रजाती आढळतात. यातील पश्चिम किनारपट्टीवर एकूण २७ जाती, तर पूर्वकिनारपट्टीवर ४० जाती आढळतात. अंदमान आणि निकोबार या बेटावर ३८ जाती आढळल्या आहेत.