संत निरंकारी समागममध्ये ९९ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 07:07 AM2018-01-31T07:07:23+5:302018-01-31T07:07:55+5:30
संत निरंकारी महाराष्ट्राच्या ५१व्या समागमाच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी विविध जाती, धर्मांतील तसेच परदेशातील ९९ जोडपी विवाहबद्ध झाली. गेल्या तीन दिवसांपासून खारघर येथे समागम सुरू होते.
पनवेल : संत निरंकारी महाराष्ट्राच्या ५१व्या समागमाच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी विविध जाती, धर्मांतील तसेच परदेशातील ९९ जोडपी विवाहबद्ध झाली. गेल्या तीन दिवसांपासून खारघर येथे समागम सुरू होते. देशभरातील विविध राज्यांतून लाखो भक्त या वेळी उपस्थित होते. तीन दिवसांत तीन लाखांपेक्षा जास्त भक्तांनी या समागमाला भेट दिली.
सामूहिक विवाहसोहळ्यात हिमाचल प्रदेश, आंध्रप्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, पंजाब, चंदिगड आदींसह देशातील विविध राज्यांतील वधूवरांचा समावेश होता. यापैकी अनेक वधूवर उच्चशिक्षित आहेत. विवाहसोहळ्यासाठी निरंकारी मिशनचे पारंपरिक जयमाला आणि सामूहिक हार परिधान केले होते. नवविवाहितांना शुभेच्छा देताना सत्संग, स्मरण, निष्काम सेवा करण्याची प्रेरणा सविंदर माता यांनी दिली. तीन दिवसीय समागमात विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले. सेवा दल रॅली, विविध राज्यातील भक्तांच्या सामूहिक गीतांचे गायन, मल्लखांब प्रात्यक्षिके आदींसह विविध कार्यक्रम पार पडले. खारघरमध्ये दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. समागमाचे नियोजन महिन्याभरापूर्वी सुरू होते. भक्तांसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.