तेरे बाप को बोल, और... भाजपाच्या गणेश नाईकांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 12:12 PM2020-03-09T12:12:45+5:302020-03-09T12:29:24+5:30
गणेश नाईक यांनी जशास तसे उत्तर देत जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. '
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक व नाईक कुटुंबीयांवर सडकून टिका केली होती. मी अशा गद्दराना विचारत नाही. जे बाळासाहेबांचे झाले नाही ते पवार साहेबांचे कसे होतील”, असा शब्दांत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर घणाघाती टीका केली होती. अर्थातच, आव्हाड यांची बोचरी टीका गणेश नाईक यांना रुचली नाही. म्हणून, गणेश नाईक यांनीही तशाच भाषेत आव्हाड यांच्यावर प्रहार केला.
गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी पक्ष नवी मुंबईत संपवला. कोण होते गणेश नाईक, हे विश्वास ठेवून आम्ही बघितले. मी पाच वर्षांपूर्वी बोललो होतो हे जाणार. दादाच्या मनात किती पाप होते, हे आम्हाला माहिती आहे. ते ठाण्यामध्येही नगरसेवकांचे कान चावत होते. पण, ठाणे महापालिका आम्ही शाबूत ठेवली, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशावरुन टीका केली होती.
गणेश नाईक यांनी जशास तसे उत्तर देत जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. 'ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक,' असा डायलॉग मारत अभिनेते नाना पाटेकरस्टाईलने आव्हाड यांना चॅलेंज केलंय. तसेच, गणेश नाईकला खंडणी बहाद्दर म्हणून आरोप केले जातात. पण, माझ्यावर साधी एक एनसीही दाखल नाही. हाथी चलता है अपनी चाल से... असे म्हणत नाईक यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे.