- नितीन देशमुखपनवेल : पनवेल महापालिकेतील विकासकामांना निधीची कमतरता असताना प्रशासन मात्र अनेक ठिकाणी उधळपट्टी करीत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने अतिक्रमण पथकाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी २०,००० रुपये देऊन तीन कर्मचारी नेमले आहेत. त्यापैकी एकाची नियुक्ती आयुक्तांच्या केबिनबाहेर केली आहे.पनवेल महापालिकेचे उत्पन्न कमी असल्याने १२०० कोटी रुपयांचे बजेट कमी करण्यात आले. यात अनेक विकासकामांना कात्री लावण्यात आली. अतिक्रमण पथकाच्या संरक्षणासाठी मात्र शासकीय एजन्सी असलेल्या रायगड सिक्युरिटी बोर्डकडून सुरक्षारक्षक न घेता जास्त दर असलेल्या पुण्याच्या सी.डी.एस.एस.एस. या एजन्सीकडून सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले असून त्यांना प्रत्येकी ५ हजार रु पये जास्त देण्यात येत आहेत. त्यापैकी दोन सुरक्षारक्षक दोन पाळीत अतिक्र मण पथकाबरोबर काम करणार आहेत तर एका सुरक्षारक्षकाची नियुक्ती आयुक्तांच्या केबिनबाहेर करण्यात आली आहे. आयुक्तांना पोलीस संरक्षण आहे, असे असताना खासगी सुरक्षा रक्षकांची गरज काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.महापालिकेने कर्मचारी कमी असल्याने सांगून निवृत्त पेन्शनर अधिकाºयांच्या नेमणुका कंत्राटी पध्दतीने केल्या आहेत. त्यांना ५० ते ६० हजार रु पये पगार देण्यात येत आहे. अशा अधिकाºयांची संख्या ४० पेक्षा जास्त आहे. सध्या ते स्वच्छता सर्वेक्षणाचे काम करीत आहेत.
अतिक्रमण पथकाच्या सुरक्षेसाठी खास नियुक्ती;पनवेल महापालिकेतील कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:12 AM