शहरात ‘स्पेशल छब्बीस’चे रॅकेट उघडकीस; बोगस संस्थेसाठी गमावल्या नोक-या, अनेकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:34 AM2018-02-15T03:34:12+5:302018-02-15T03:34:22+5:30

केंद्र सरकारची संस्था असल्याचे समजून अनेकांनी बोगस संस्थेपायी नोकºया गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. बोगस संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीच्या तक्रारीआधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चौकशीत त्यांनी ८ ते १० हजार रुपये घेऊन ५०हून अधिकांना बोगस संस्थेत नोकरीला लावल्याचे उघड झाले.

 Special Chabbis' racket exposed in city; Many lost jobs for bogus organization, many | शहरात ‘स्पेशल छब्बीस’चे रॅकेट उघडकीस; बोगस संस्थेसाठी गमावल्या नोक-या, अनेकांना गंडा

शहरात ‘स्पेशल छब्बीस’चे रॅकेट उघडकीस; बोगस संस्थेसाठी गमावल्या नोक-या, अनेकांना गंडा

Next

- सुर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : केंद्र सरकारची संस्था असल्याचे समजून अनेकांनी बोगस संस्थेपायी नोकºया गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. बोगस संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीच्या तक्रारीआधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चौकशीत त्यांनी ८ ते १० हजार रुपये घेऊन ५०हून अधिकांना बोगस संस्थेत नोकरीला लावल्याचे उघड झाले.
‘स्पेशल छब्बीस’ या हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणे पनवेलमधील अनेक कंपन्यांमध्ये बनावट छापे पडल्याचे समोर आले आहे. दोघा व्यक्तींनी सुशिक्षित तरुणांची दिशाभूल करून त्यांच्या माध्यमातून हे छापे टाकले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अशा कारवाई करणाºया संस्थेच्याच कार्यालयावर खºया पोलिसांचा छापा पडल्यानंतर ती संस्थाच बोगस असल्याचे तिथे नोकरी करणाºया तरुणांच्या लक्षात आले. मागील काही महिन्यांपासून पनवेल परिसरात क्राइम इंटेलिजन्स फोर्स व इंटेलिजन्स इनव्हेस्टिगेशन एजन्सी नावाच्या संस्थेचा सुळसुळाट होता.
सदर संस्था केंद्र सरकारची असून, त्या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी असल्याच्या थाटात महेश मधुकर भडके (२५) व उमेश लक्ष्मण मोहिते (३२) हे परिसरात वावरत होते. शिवाय त्यांनी या संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून ५०हून अधिक तरुणांकडून ८ ते १० हजार रुपये घेऊन त्यांना नोकरीही दिली होती. केंद्र सरकारच्या संस्थेत नोकरी मिळत असल्याने अनेकांनी सध्याची चांगली नोकरी सोडलेली आहे.
महेश व उमेश हे नोकरीला ठेवलेल्या तरुणांमार्फत विविध ठिकाणी धाड टाकायचे. तिथल्या कागदपत्रांची पडताळणी करून सेल्सटॅक्स भरला नाही, अथवा इतर कारणांवरून व्यावसायिकांना सक्तीने गाडीत बसवून चौकशीसाठी कार्यालयात घेऊन जायचे. अशाच एका प्रकाराची तक्रार हरिओम चौरासिया यांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे केली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी यांनी युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्याकडे तपास सोपवला होता. त्याकरिता सहायक निरीक्षक बी. एम. रायकर, बबन जगताप, हवालदार सुनील साळुंखे, अनिल पाटील, संजीव पगारे, सुनील कानगुडे, सूर्यकांत कुडावकर, प्रफुल्ल मोरे यांचे पथक तयार करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकाने खांदेश्वर येथील क्राइम इंटेलिजन्स फोर्स व इंटेलिजन्स इनव्हेस्टिगेशन एजन्सी नावाच्या संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकला. त्या ठिकाणावरून महेश मधुकर भडके (२५) व उमेश लक्ष्मण मोहिते (३२) यांना अटक करून त्यांची कार जप्त करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या या कारवाईनंतर महेश व उमेश याच्या इशाºयावर काम करणाºया तरुणांना आपण बोगस संस्थेसाठी काम करत होतो, याची जाणीव झाल्याचे उपआयुक्त तुषार दोशी यांनी सांगितले. तसेच आनंद त्रिपाठी हा संस्थेचा प्रमुख असून, त्याचा शोध सुरू असल्याचेही दोशी यांनी सांगितले.

बोगस संस्थांबरोबरच काही बोगस पत्रकारांनीही शहरात धुडगूस घातला आहे. बोगस डॉक्टर, व्यावसायिक हे पत्रकार असल्याची ओळखपत्रे दाखवून आपला धाक निर्माण करत आहेत. त्यांना बाजारभावानुसार ओळखपत्रे वाटणाºया संघटना शहरात सक्रिय झाल्या आहेत. त्यामध्ये गुप्तचर मीडिया, मीडिया इंटिलिजन्स अशा नावाच्या बोगस संघटनांसह सोयीनुसार निघणारी साप्ताहिके आघाडीवर आहेत. अशांवरही कारवाई होणे गरजेचे असताना, काही पोलीसच त्यांच्याशी जवळीक साधून असल्याचे दिसत आहे.

बोगस संस्था चालवणारा महेश भडके हा काही वर्षांपूर्वी होमगार्डची नोकरी करायचा. गतवर्षी त्याने नवी मुंबई पोलीस भरतीतही नशीब आजमावले होते; परंतु परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्याने आनंद त्रिपाठीच्या सांगण्यानुसार बोगस संस्थेचे कार्यालय सुरू केले होते. दरम्यानच्या काळात काही दिवस तो पोलीस मित्र म्हणून काही ठिकाणी पोलिसांसोबत रात्रीच्या बंदोबस्तावरही असायचा.

व्यावसायिकांवर छापा टाकताना प्रभाव पडावा, यासाठी ते स्वत:कडे खेळण्यातले पिस्तुल बाळगायचे. तर शासनाची मुद्रा असलेली ओळखपत्रे कामगार तरुणांना देण्यात आली होती. यानुसार फिल्मी स्टाइलने ते निश्चित ठिकाणी बनावट छापा टाकून मांडवलीच्या माध्यमातून लाखो रुपये उकळायचे.

बनावट संघटनांकडून राज्य अथवा केंद्र सरकारच्या संघटनेशी मिळत्या-जुळत्या नावाचा वापर होत आहे, अशा संघटनेचा शासनाशी कसलाही संबंध नाही. त्यांच्याकडून व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावले जात असल्यास स्थानिक पोलिसांकडे अथवा गुन्हे शाखेकडे तक्रार करावी.
- तुषार दोशी, उपआयुक्त- गुन्हे शाखा

Web Title:  Special Chabbis' racket exposed in city; Many lost jobs for bogus organization, many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.