बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष पथक, प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:41 AM2017-09-25T00:41:44+5:302017-09-25T00:41:51+5:30
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणाºया बालकांवरील अत्याचाराची प्रकरणे काळजीपूर्वक हाताळण्याकरिता विशेष बाल पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे
कळंबोली : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणाºया बालकांवरील अत्याचाराची प्रकरणे काळजीपूर्वक हाताळण्याकरिता विशेष बाल पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकात पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर या पथकाकडून प्रतिबंधात्मक कारवाई व उपाययोजना सुध्दा अपेक्षित आहेत.
बालकांवर शारीरिक, मानसिक त्याचबरोबर लंैगिक अत्याचाराच्या घटना घडतात. त्या विरोधात शासनाने बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा केला आहे. त्यामध्ये अत्याचार करणाºयावर कठोर कारवाई आणि शिक्षेची तरतूद आहे. जुवेनाइल जस्टिस अॅक्टच्या कलम (१०७) नुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात बालकल्याण अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. यात नवी मुंबई, पनवेल आणि उरणचा समावेश होता.
गुरुग्राम येथील रायन स्कूलमध्ये विद्यार्थ्याची हत्या झाल्याने शासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. २३ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांनी आदेश काढले असून त्याची प्रत पथकाच्या सदस्यांना देण्यात आली आहे.