कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांचा सुपर संडे
By वैभव गायकर | Published: March 31, 2024 05:41 PM2024-03-31T17:41:55+5:302024-03-31T17:41:55+5:30
निसर्ग पर्यटनासाठी शेकडो पर्यटकांची कर्नाळा अभयारण्याला पसंती
पनवेल: नजीकच्या काळात निसर्ग पर्यटनाचे महत्व वाढू लागले आहे.विशेषतः सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या मुंबई उपनगरातील नागरिक आवर्जुन नैसर्गिक पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत.यामुळेच पनवेल मधील कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.रविवार दि.31 रोजी मोठ्या संख्येने पर्यटकांनी कर्नाळा अभयारण्यात हजेरी लावली.
एकीकडे उकाडा वाढत आहे.मार्च महिन्यात त्याची प्रचिती आली.पुढील दोन महिने हा उकाडा कायम राहणार आहे. मार्च महिन्यात हजारो पर्यटकांनी कर्नाळा अभयारण्यात भेट दिली.यामुळे अभयारण्य प्रशासनाला लाखोंचा महसूल देखील प्राप्त झाला आहे.स्थानिक महिला बचत गटांना देखील या पर्यटकांमुळे रोजगार प्राप्त होत आहे.मुंबई,पुणे आदींसह राज्यभरातून पर्यटक याठिकाणी येत आहे.अभयारण्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला कर्नाळा किल्ला याबाबत कुतूहलाने माहिती घेण्यासाठी पर्यटक येत आहेत.
मुंबईपासून 62 कि.मी. अंतरावर असलेले हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.कर्नाळा येथे निरनिराळया प्रकारचे वृक्ष असून येथे 150 जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात.कर्नाळा किल्ल्याला देखील मोठा ऐतिहासिक वारसा आहे.याकरिता देखील दुर्ग प्रेमी याठिकाणी येत आहेत.ट्रेकिंग करत कर्नाळा किल्ला सर करण्यासाठी देखील तरुणाईची पाऊले याठिकाणी वळत आहेत.
निसर्ग पर्यटनासाठी पर्यटक तसेच गड किल्ले अभ्यासक मोठ्या संख्येने कर्नाळा अभयारण्याला भेट देत आहेत.मार्च महिन्यात हजरो पर्यटकांनी याठिकाणी भेट दिली.
-एन डी राठोड (वनक्षेत्रपाल,कर्नाळा अभयारण्य )