पनवेलमध्ये १० हजार घरे शौचालयाविना
By admin | Published: November 15, 2016 04:54 AM2016-11-15T04:54:53+5:302016-11-15T04:54:53+5:30
पनवेल तालुक्यात जवळपास १० हजार घरे शौचालयाविना असल्याची माहिती समोर आली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत संपूर्ण पनवेल तालुका
पनवेल : पनवेल तालुक्यात जवळपास १० हजार घरे शौचालयाविना असल्याची माहिती समोर आली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत संपूर्ण पनवेल तालुका हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने पनवेल पंचायत समिती प्रयत्नशील आहे. मात्र अद्याप २७ टक्के घरे शौचालयाविना असून जवळपास ७३ टक्के नागरिकांनी शौचालये बांधल्याची माहिती पंचायत समितीतून देण्यात आली आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत संपूर्ण पनवेल तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी पनवेल पंचायत समितीमध्ये नुकतीच सभा घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने ‘कॉफी विथ विनर’ अशा कार्यक्र माचे आयोजन केले असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी सांगितले. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार असून संपूर्ण पनवेल तालुका लवकरच हागणदारीमुक्त होईल, असा आशावाद व्यक्त केला. (वार्ताहर)