चंदिगडमधून आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 06:35 AM2017-09-14T06:35:14+5:302017-09-14T06:35:29+5:30
एनआरआय पोलिसांनी चंदिगड येथून आंतरराज्यीय टोळीच्या दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून त्याच्याकडून सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. कारने नवी मुंबईत येवून ही टोळी घरफोडी करून पळून जायची. त्यांच्याकडून ४ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबई : एनआरआय पोलिसांनी चंदिगड येथून आंतरराज्यीय टोळीच्या दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून त्याच्याकडून सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. कारने नवी मुंबईत येवून ही टोळी घरफोडी करून पळून जायची. त्यांच्याकडून ४ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
उलवे परिसरात घरफोडी करणाºया गुन्हेगारांमध्ये चंदिगढ येथील टोळीचा समावेश असल्याची माहिती एनआरआय पोलिसांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी विशेष पथकामार्फत तपासाला सुरवात केली होती. यादरम्यान भाडोत्री घरामध्ये राहणाºया काही व्यक्तींबाबत संशयास्पद माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक निरीक्षक अशोक फल्ले, उपनिरीक्षक भूषण कापडणीस, हवालदार जगदीश पाटील, विष्णू नरवाडे, दीपक सावंत, सचिन बोठे आदींचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्याकडून संशयित गुन्हेगाराचा शोध सुरू असताना दोघे जण हाती लागले. त्यामध्ये एक जण अल्पवयीन असून सुमित सिंग (३२) असे दुसºयाचे नाव आहे. दोघेही चंदिगडचे राहणारे असून साथीदारांसह नवी मुंबईत उलवे परिसरात यायचे. त्याठिकाणी काही दिवसांसाठी भाडोत्री घर घेवून रात्रीच्या वेळी परिसरात घरफोडी करायचे. अशाप्रकारे त्यांनी केलेल्या सात गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. या गुन्ह्यातील चार लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल भाड्याने घेतलेल्या घरातून तसेच चंदिगड येथील राहत्या घरातून जप्त केला आहे.
या टोळीने राज्यात इतरही अनेक ठिकाणी गुन्हे केल्याची शक्यता आहे. यानुसार एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत.