अमित पांघल, पूजा राणी यांचा ‘गोल्डन पंच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 03:13 AM2019-04-27T03:13:30+5:302019-04-27T03:13:40+5:30
स्टार बॉक्सर अमित पांघल याने सुवर्णमय घोडदौड सुरू ठेवृून ५२ किलो प्रकारात यंदा दुसरे सुवर्ण जिंकले.
बँकॉक : स्टार बॉक्सर अमित पांघल याने सुवर्णमय घोडदौड सुरू ठेवृून ५२ किलो प्रकारात यंदा दुसरे सुवर्ण जिंकले. ८१ किलो गटात पूजा राणी हिने देखील सुवर्ण पदाकाची कमाई करताच शुक्रवारी संपलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत शनदार कामगिरीसह भारताने १३ पदकांची कमाई केली. त्यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्यचा समावेश आहे. महिला आणि पुरुषांची स्पर्धा एकाचवेळी आयोजित होण्याची ही पहिली वेळ ठरली.
मागच्या वर्षी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या पांघलने कोरियाचा किम इंक्यूवर मात केली. अमितने बल्गेरियातील स्ट्रांजा मेमोरियल स्पर्धेतही सुवर्ण जिंकले होते. यंदा ४९ वरुन ५२ किलो गटात आल्यापासून अमितची ही पहिलीच स्पर्धा होती. २०१५ मध्ये अमितने कांस्य जिंकले होते.
पूजाने चीनची वांग लिना हिचा पराभव करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले. वडिलांचा विरोध पत्करुन मुष्टियुद्धात करिअर सुरू करणाºया पूजाने ६ महिन्यातच कुटुंबीयांची समजूत घातली. २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने कांस्य जिंकले होते.
राष्टÑीय चॅम्पियन दीपकसिंग (४९ किलो), आशिष कुमार(७५) व कविंदरसिंग (५६) यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. याआधी भारतीय पुरुषांची सर्वोत्कृष्ट कामगिरी २००९ मध्ये झाली होती. त्यावेळी दोन सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य पदके जिंकण्यात यश आले होते.
पांघलने आक्रमक सुरूवात केली. प्रतिस्पर्धी खेळाडूकडे अमितच्या ठोशांचे उत्तर नव्हते. ४९ किलो अंतिम लढतीत दीपकला उझबेकिस्तानचा नोदिरजोन मिझारमेदोवने गुणविभागणीच्या बळावर नमवले. भारताने रेफ्रीच्या निर्णयावर ‘येलोकार्ड’ दाखवून अपील केले होते. त्यानुसार रेफ्रीने स्लो मोशन फुटेज पाहून निर्णय दिला. हा निर्णय भारताच्या विरोधात गेला.