अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर सज्ज
By admin | Published: May 22, 2016 02:45 AM2016-05-22T02:45:55+5:302016-05-22T02:45:55+5:30
शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, नवा अध्यक्ष कोण? या चर्चांना रविवारी पूर्णविराम मिळणार आहे
मुंबई : शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, नवा अध्यक्ष कोण? या चर्चांना रविवारी पूर्णविराम मिळणार आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयची सूत्रे आपल्याकडे घेण्यासाठी विद्यमान सचिव अनुराग ठाकूर जवळजवळ सज्ज आहेत. रविवारी मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीमध्ये (एसजीएम) बिनविरोधपणे अध्यक्ष म्हणून निवडून येण्यास ठाकूर तयार आहेत.
सध्या सचिव म्हणून बीसीसीआयची धुरा सांभळत असलेले ठाकूर यांना पूर्व विभागाकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळणार असून, या पदासाठी आता पूर्व विभागाचा क्रमांक आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याचे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे, लोढा समितीच्या शिफारशींना लागू करण्याचा दबाव बीसीसीआयवर असताना ४१ वर्षीय ठाकूर या पदाचा कारभार सांभाळतील. (वृत्तसंस्था)
युवा अध्यक्ष होणार
अनुराग ठाकूर यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदी औपचारिक घोषणा बाकी राहिली असताना उद्या बीसीसीआयच्या इतिहासामध्ये विशेष नोंदही होईल. ठाकूर हे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असून, रविवारी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते आतापर्यंतचे सर्वात युवा बीसीसीआय अध्यक्ष होतील.
म्हणून दिला राजीनामा
मुंबई : काहीदिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या शशांक मनोहर यांनी आपली आपली भूमिका स्पष्ट करताना, ‘‘न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यास मी असक्षम होतो
आणि बीसीसीआयचा ढाचा कोसळताना मी पाहू शकत नाही.’’ असे धक्कादायक वक्तव्य केले. आयसीसीचे
पहिले स्वतंत्र चेअरमनपद झाल्यानंतर मनोहर यांनी सांगितले की ‘‘लोढा समितीच्या आधीही मी जे काही केले ते बोर्डच्या हितासाठी केले. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यास मी सक्षम नाही. या बोर्डमध्ये माझ्याहून अनेक असे सक्षम व्यक्ती आहेत, जे या शिफारशी लागू करून घेऊ शकतात.