नवी दिल्ली : मुंबईत २०२६ मध्ये युवा आॅलिम्पिक आणि २०३० मध्ये आशियाडच्या अयोजनासह २०३२ च्या आॅलिम्पिकचे आयोजन नवी दिल्लीत करण्यास भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) उत्सुक आहे. यासंदर्भात दावेदारी सादर करण्याची शनिवारी घोषणा करण्यात आली. याशिवाय २०२१ मध्ये आयओसी काँग्रेसचे यजमानपद भूषविण्याची इच्छा आयओएने व्यक्त केली आहे.आयओएप्रमुख नरेंद्र बत्रा यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सांगितले, की बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले, त्यात आशियाड आणि आॅलिम्पिकच्या यजमानपदाची दावेदारी करण्यासह नव्या समिती आणि आयोगाची स्थापना करण्यावर चर्चा झाली. भविष्यातील योजनेनुसार निर्णय झाले आहेत. आयओएच्या कार्यकारिणीने गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या कामगिरीचीही समीक्षा केली. अपयशावर तोडगा शोधण्यासाठी नवी समिती आणि आयोग स्थापण्याचा निर्णय झाला.’इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात १८ आॅगस्ट ते २ डिसेंबर या कालावधीत आशियाडचे आयोजन होत आहे. त्याआधी २३७० खेळाडू आणि अधिकाऱ्यांची नोंदणीकरण्यात आली आहे. आशियाडसाठी खेळाडू आणि अधिकाºयांची लांबलचक यादी आयोजकांकडे पाठविण्यात आली असून विविध संघटनांकडून अंतिम निवड झाल्यानंतर भारतीय पथकाचा आकार लहान करण्यात येईल, असे बत्रा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)आशियाडसाठी ९०० जणांचे पथक?जकार्ता आशियाडसाठी भारताचे ९०० जणांचे पथक पाठविण्यात येईल, असे संकेत मिळाले आहेत. आयओएप्रमुख नरेंद्र बत्रा आणि सचिव राजीव मेहता यांनी ६२० हून अधिक खेळाडू, तसेच २७३ अधिकाºयांच्या अंतिम यादीला मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.सध्याच्या अस्थायी यादीत १९३८ खेळाडू, ३९९ अधिकारी, आयओएचे आठ, क्रीडा मंत्रालयाचे सात आणि साईच्या १८ अधिकाºयांची नावे आहेत. यातील नावे गाळून ३० जूनपर्यंत यादीला अंतिम स्वरूप द्यायचे आहे. मंत्रालयाशी सल्लामसलत केल्यानंतर ही यादी ९०० वर आणण्यात येणार असल्याचे मेहता म्हणाले.२०१४ च्या इंचियोन आशियाडमध्ये भारताने ५४१ खेळाडू पाठविलेहोते. देशाला २८ खेळांमध्ये ५७ पदके मिळाली. आयओएद्वारेनिलंबित असलेल्या तायक्वाँदो, गोल्फ, जिम्नॅस्टिक आणि तिरंदाजीसंघांची निवड अस्थायी समिती करेल. भारतीय गोल्फ महासंघाने ६ जूनपर्यंत घटनादुरुस्ती केल्यास आशियाडसाठी गोल्फ संघ पाठविला जाईल,असे मेहता यांनी सांगितले.आई-वडिलांना अॅक्रिडेशन नाहीचआशियाडसाठी खेळाडूंच्या आई-वडिलांना अॅक्रिडेशन (प्रवेशपत्र) न देण्याच्या धोरणाचे कठोर पालन करण्याचा भारतीय आॅलिम्पिक संघटनेने निर्णय घेतला आहे. राष्टÑकुल स्पर्धेसाठी सायना नेहवालने वडील हरवीरसिंग यांना अॅक्रिडेशन न दिल्यास स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. आयओएने नमते घेत तिच्या वडिलांना अॅक्रिडेशन दिले.सायनाने राष्टÑकुलचे सुवर्ण जिंकले. आशियाडसाठी आम्ही खेळाडूंच्या आई-वडिलांना अॅक्रिडेशन देणार नाही. राष्टÑीय महासंघ आई-वडील, पती, पत्नी किंवा नातेवाईक यांचे नाव सहयोगी स्टाफमध्ये सहभागी करीत असेल तर आयओए आक्षेप घेणार नाही, असेही राजीव मेहता यांनी स्पष्ट केले.
आशियाड २०३०, आॅलिम्पिक २०३२ ची दावेदारी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 3:07 AM