Asian games 2018: गोविंदन लक्ष्मणनच्या पाठीशी सहानुभूतीची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 08:48 AM2018-08-27T08:48:28+5:302018-08-27T08:48:54+5:30

Asian games 2018: हिमा दास व मोहम्मद अनास यांनी आशियाई स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले.

Asian games 2018: Govindan Laxman's sympathy wave | Asian games 2018: गोविंदन लक्ष्मणनच्या पाठीशी सहानुभूतीची लाट

Asian games 2018: गोविंदन लक्ष्मणनच्या पाठीशी सहानुभूतीची लाट

Next

मुंबई - हिमा दास व मोहम्मद अनास यांनी आशियाई स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले. त्यापाठोपाठ १०००० मीटर शर्यतीत गोविंदन लक्ष्मणन याने विक्रमी कांस्यपदक जिंकल्याचे वृत्त आले आणि भारतीय चाहत्यांना आनंद गगनात मावेनासा झाला. त्यात भर महिलांच्या १०० मीटर शर्यतीत द्युती चंदने रौप्यपदक जिंकले. मात्र आनंदाच्या वातावरणात मीठाचा खडा पडला. लक्ष्मणनचे कांस्यपदक हिरावून घेण्यात आले. 



भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने त्याविरोधात दाद मागूनही काहीच उपयोग झाला नाही आणि भारताचे एक पदक कमी झाले. लक्ष्मणनने २९ मिनिटे ४४.९१ सेकंदाची वेळ नोंदवून हे पदक जिंकले होते. मात्र शर्यतीत धावताना त्याचा पाय रेषेबाहेर पडला आणि तो अपात्र ठरला. १९९८ मध्ये बॅंकॉक आशियाई स्पर्धेत गुलाब चंद यांनी १०००० मीटर शर्यतीचे कांस्य जिंकले होते आणि त्यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा लक्ष्मणन हा पहिलाच भारतीय होता. 

आशियाई आयोजकांच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर भरपूर टीका झाली. मात्र त्याचवेळी लक्ष्मणनच्या पाठीशी सर्व उभे राहिले.




Web Title: Asian games 2018: Govindan Laxman's sympathy wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.