Asian Games 2018: दुसरे आशियाई सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न विकासला अर्ध्यावर सोडावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 12:24 PM2018-08-31T12:24:48+5:302018-08-31T12:43:04+5:30

Asian Games 2018: 2010 च्या आशियाई स्पर्धेनंतर दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न बॉक्सर विकास कृष्णनला अर्ध्यावर सोडावे लागले.

Asian Games 2018: Injured Vikas Krishan can't fight semis, to get boxing bronze | Asian Games 2018: दुसरे आशियाई सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न विकासला अर्ध्यावर सोडावे लागले

Asian Games 2018: दुसरे आशियाई सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न विकासला अर्ध्यावर सोडावे लागले

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा: 2010 च्या आशियाई स्पर्धेनंतर दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न बॉक्सर विकास कृष्णनला अर्ध्यावर सोडावे लागले. उपांत्य फेरीच्या लढतीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याने विकासने माघार घेतली आणि त्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत विकाससमोर कझाकिस्तानच्या अमानकुल अबिलखानचे आव्हान होते, परंतु विकासने माघार घेतल्याने अबिलखानला पुढे चाल देण्यात आली.



पुरुषांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून विकासने भारतासाठी पदक निश्चित केले होते. मात्र, डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढे खेळणे शक्य झाले नाही. विकासने आठ वर्षांपूर्वी ग्वांझाऊ येथे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 2014 मध्ये आणि आता 2018 मध्ये त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.



भारतीय बॉक्सर्समध्ये आशियाई स्पर्धेत 26 वर्षीय विकासने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या एर्बिक तांगलातीहानविरूद्ध विकासच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यातही त्याने विजय मिळवला होता. मात्र, उपांत्य फेरीपूर्वी दुखापत बरी न झाल्याने त्याला माघार घ्यावी लागली. 

Web Title: Asian Games 2018: Injured Vikas Krishan can't fight semis, to get boxing bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.