आशियाई ऑलिम्पिक पात्रता मुष्टीयुद्ध, अमित पंघालला अव्वल मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:21 AM2020-03-03T04:21:40+5:302020-03-03T04:21:47+5:30
जागतिक रौप्यपदक विजेता अमित पंघालला (५२ किलो) मंगळवारपासून येथे सुरु होत असलेल्या आशियाई ऑलिम्पिक मुष्टीयुद्ध पात्रतामध्ये पुरुष विभागात अव्वल मानांकन मिळाले.
अम्मान : जागतिक रौप्यपदक विजेता अमित पंघालला (५२ किलो) मंगळवारपासून येथे सुरु होत असलेल्या आशियाई ऑलिम्पिक मुष्टीयुद्ध पात्रतामध्ये पुरुष विभागात अव्वल मानांकन मिळाले. त्याचवेळी दिग्गज एम. सी. मेरीकोमला (५१) महिलांमध्ये दुसरे मानांकन आहे. भारताचे ८ पुरुष व ५ महिला खेळाडू या स्पर्धेतून आॅलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करण्यास प्रयत्नशील आहेत. पुरुष विभागात मानांकन प्राप्त पंघाल एकमेव भारतीय असून महिला विभागात लवलिना होरगोहिन (६९ किलो) व पूजा राणी (७५ किलो) यांना आपापल्या गटात अनुक्रमे दुसरे व चौथे मानांकन मिळाले. स्पर्धेत ६३ कोटा निश्चित होतील. मुष्टीयोद्धांना उपांत्य फेरी गाठत पात्रता मिळविण्याची संधी आहे. (वृत्तसंस्था)
भारतीय मुष्टीयुद्ध संघ
पुरुष : अमित पंघाल (५२ किलो), गौरव सोलंकी (५७ किलो), मनीष कौशिक (६३ किलो), विकास कृष्णन (६९ किलो), आशीष कुमार (७५ किलो), सचिन कुमार (८१ किलो), नमन तंवर (९१ किलो), सतीष कुमार (९१ किलोपेक्षा अधिक).
महिला : एम. सी. मेरीकोम (५१ किलो), साक्षी चौधरी (५७ किलो), सिमरनजीत कौर (६० किलो), लोवलिना बोरगोहिन (६९ किलो), पूजा राणी (७५ किलो).