विंडीजला नमवून आॅस्ट्रेलिया फायनलमध्ये

By admin | Published: June 22, 2016 06:18 PM2016-06-22T18:18:26+5:302016-06-22T18:18:26+5:30

विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाने ओव्हल मैदानावर वेस्ट इंडिजचा सातव्या सामन्यात सहा गड्यांनी पराभव करीत तिरंगी वन डे मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

Australia win the Windies | विंडीजला नमवून आॅस्ट्रेलिया फायनलमध्ये

विंडीजला नमवून आॅस्ट्रेलिया फायनलमध्ये

Next

ऑनलाइन लोकमत

ब्रिजटाऊन, दि. 22- विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाने ओव्हल मैदानावर वेस्ट इंडिजचा सातव्या सामन्यात सहा गड्यांनी पराभव करीत तिरंगी वन डे मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मर्लोन सॅम्युअल्सचे पहिले शतक आणि दिनेश रामदिनसोबतच्या विक्रमी भागीदारीच्या बळावर विंडीजने ८ बाद २८२ धावा उभारल्या. सॅम्युअल्सने अखेरच्या चेंडूवर बाद होण्याआधी १३४ चेंडूत १४ चौकार आणि दोन षटकारांसह १२५ तर रामदिनने ९१ धावा ठोकल्या. या दोघांंनी चौथ्या गड्यासाठी १९२ धावांची भागीदारी केली.
आॅस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ ७८ आणि मिशेल मार्शने नाबाद ७९ धावांचे योगदान दिले. ग्लेन मॅक्सवेलने २६ चेंडूत नाबाद ४६ धावा ठोकताच ४८.४ षटकांत चार बाद २८३ धावा करणाऱ्या आॅस्ट्रेलियाचा विजय साकार झाला. स्मिथ- मार्श यांनी चौथ्या गड्यासाठी १२२ धावा ठोकल्या. स्मिथ ४२ व्या षटकांत बाद होताच विंडीजला सामना जिंकण्याची आशा होती पण मॅक्सवेलने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.
त्याआधी सॅम्युअल्सने दहावे वन डे शतक ठोकून विंडीजला दमदार मजल गाठून दिली. मागच्या सामन्यात आॅस्ट्रेलियावरील विजयात त्याने ९२ धावांचे योगदान दिले होते. विंडीजची सुरुवात खराब झाली. ३१ धावांत तीन गडी बाद झाले होते. सॅम्युअल्स-रामदिन यांनी १९२ धावा ठोकून आॅस्ट्रेलियाच्या तोंडचे पाणी पळविले होते. या खेळीदरम्यान सॅम्युअल्सने वन डेत पाच हजार
तर रामदिनने दोन हजार धावांचा टप्पा गाठला. याआधी क्लाईव्ह लॉईड-रोहण कन्हाय यांनी लॉर्डस्वर पहिल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ४१ वर्षांआधी १४९ धावांची भागीदारी केली होती. सॅम्युअल्स-रामदिन यांनी तो विक्रम मोडीत काढला.

 

Web Title: Australia win the Windies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.