गुलाबी चेंडूवर पहिले त्रिशतक ठोकण्याचा मान अझर अलीला

By admin | Published: October 15, 2016 01:30 AM2016-10-15T01:30:50+5:302016-10-15T01:30:50+5:30

सलामीवीर अजहर अली (नाबाद ३0२) याचे गुलाबी चेंडूवरील दिवस-रात्र कसोटी सामन्यातील विक्रमी पहिले त्रिशतक आणि शमी असलम (९0) याच्या साथीने पहिल्या गड्यासाठी केलेल्या

Azhar Ali, the first trio of pink ball hit | गुलाबी चेंडूवर पहिले त्रिशतक ठोकण्याचा मान अझर अलीला

गुलाबी चेंडूवर पहिले त्रिशतक ठोकण्याचा मान अझर अलीला

Next

दुबई : सलामीवीर अजहर अली (नाबाद ३0२) याचे गुलाबी चेंडूवरील दिवस-रात्र कसोटी सामन्यातील विक्रमी पहिले त्रिशतक आणि शमी असलम (९0) याच्या साथीने पहिल्या गड्यासाठी केलेल्या २१५ धावांच्या भागीदारीच्या बळावर पाकिस्तानने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहिला डाव ३ बाद ५७९ धावांवर घोषित केला.
अजहरने चौकार मारत त्रिशतक ठोकल्याबरोबरच कर्णधार मिसबाह उल हक याने पाकिस्तानचा डाव घोषित केला. अजहरने ४६९ चेंडूंत २३ चौकार व २ षटकारासह नाबाद ३0२ धावांची विक्रमी खेळी केली. दिवस-रात्र गुलाबी चेंडूंवर खेळवल्या जाणाऱ्या कसोटीत त्रिशतक ठोकणारा अजहर पहिला फलंदाज ठरला. त्याचप्रमाणे अजहर हा हनीफ मोहम्मद, इंजमामुल हक आणि युनूस खाननंतर त्रिशतक ठोकणारा पाकिस्तानचा चौथा फलंदाज ठरला.
पाकिस्तानने कालच्या १ बाद २७९ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. अजहर अली १३६ आणि असद शफिक ३३ धावांवर नाबाद होते. आपल्या ४00 व्या कसोटीत पाकिस्तानने सकाळी आपली स्थिती २ बाद ३९१ पर्यंत पोहोचवली. शफिक या सत्रात ६७ धावा केल्यानंतर देवेंद्र बिशूच्या हाती झेल देऊन बाद झाला.
सकाळच्या दोन तासांच्या खेळानंतर शफिकने शॅनन गॅब्रियल याला सलग दोन चौकार मारत द्विशतक पूर्ण केले. त्याने याच षटकात चौथ्या चेंडूवर एक धाव घेऊन पाकिस्तानच्या ४00 धावाही पूर्ण केल्या. अजहरने तिसऱ्या सत्रात त्रिशतक पूर्ण केले आणि तो पाकिस्तानचा नवा इतिहास पुरुष बनला.
असद शफिकने ६७, बाबर आजम याने ६९ व मिसबाहने नाबाद २९ धावा करीत त्याला साथ दिली.

Web Title: Azhar Ali, the first trio of pink ball hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.