ब्लिट्झ बुद्धिबळ: पहिल्या दिवशी कोनेरु हम्पी दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 01:43 AM2019-12-31T01:43:36+5:302019-12-31T01:43:57+5:30

जोरदार सुरुवातीनंतरही भारतीय ग्रँडमास्टर राहिली मागे

Blitz Chess: On the first day, Koneru Hampi in second | ब्लिट्झ बुद्धिबळ: पहिल्या दिवशी कोनेरु हम्पी दुसऱ्या स्थानी

ब्लिट्झ बुद्धिबळ: पहिल्या दिवशी कोनेरु हम्पी दुसऱ्या स्थानी

Next

मॉस्को : भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने महिला विश्व रॅपिड व ब्लिट््ज बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या दुसºया जेतेपदासाठी दमदार सुरुवात केली. मात्र यानंतरही ब्लिट््ज स्पर्धेच्या पहिल्या दिवसअखेर तीन अन्य खेळाडूंसह हम्पी संयुक्तपणे दुसºया स्थानी राहिली आहे. शनिवारी रॅपिडचे जेतेपद पटकावणाºया हम्पीने दोन दिवसीय ब्लिट््झ स्पर्धेत पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये विजयाने सुरुवात केली आणि एकवेळ ती अव्वल स्थानी होती.

हम्पीने पुढील दोन लढती बरोबरीत सोडविल्या आणि त्यानंतर आठव्या लढतीत मोनिका सैकोचा पराभव केला. दरम्यान, हम्पी पहिल्या दिवशी अव्वल स्थानावर असलेल्या रशियाच्या कॅटरिना लैगनोविरुद्ध दिवसाच्या अखेरच्या लढतीत नाट्यमयरित्या पराभूत झाली. लैगनोने २०१८ चे आपले जेतेपद राखण्याच्या दृष्टीने दमदार खेळ केला. तिने संभाव्य ९ पैकी ८ गुण मिळवले. लैगनोनंतर चार खेळाडू अलेक्सांद्रा कोस्तेनियुक, कोनेरू हम्पी, दारिया चारोचकिना व एलिना काश्लिनसकाया प्रत्येकी सात गुणांसह संयुक्तपणे दुसºया स्थानी आहेत. हम्पीने शनिवारी चीनच्या ली टिंगजीविरुद्ध आर्मेगेडोन लढत बरोबरीत सोडवत विश्व महिला रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Blitz Chess: On the first day, Koneru Hampi in second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.